आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने केली बाप्पाची आरती:बहीण अर्पिता खानच्या घरी गणेशोत्सवात झाला सहभागी, बघा व्हिडिओ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानने गणेश चतुर्थीच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. गणेशोत्सवासाठी सलमान त्याची धाकटी बहीण अर्पिता खानच्या घरी पोहोचला होता. व्हिडिओमध्ये सलमान बाप्पाची आरती करताना दिसत आहे. व्हिडिओत अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा आपल्या मुलासोबत आरती करताना दिसत आहेत. या खास निमित्ताने सलमानची आई सलमा यादेखील अर्पिताच्या घरी पोहोचली. व्हिडिओ शेअर करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले, 'गणपती बाप्पा मोरया'. दरवर्षी सलमानच्या गॅलेक्सी या घरी गणरायाचे आगमन होत असायचे. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून अर्पिता हिच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो, त्याला संपूर्ण खान कुटुंब आवर्जुन हजेरी लावत असते. सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे, तर सलमान सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे. व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...