आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टारचा नवा अंदाज:फार्महाऊसमध्ये शेती करताना दिसला सलमान खान, व्हायरल होतोय शेतात काम करतानाचा व्हिडिओ

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसात ट्रॅक्टर चालवून शेत नांगरताना दिसला सलमान खान

अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या पनवेलस्थित फार्महाऊसवर आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर तो येथेच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. सध्या तो शेती कामात व्यग्र असल्याचे त्याने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओवरुन दिसून येतंय.   अलीकडेच सलमानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो पावसात स्वतः ट्रॅक्टर चालवून शेत नांगरताना दिसतोय. तसंच मध्येच उतरुन शेताची न्याहाळणी करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सलमानने त्याला "शेती" असे कॅप्शन दिले आहे.

यापूर्वी सलमानने दोन फोटो शेअर केले होते. त्यापैकी एका फोटोत तो शेतात लावणी करताना तर दुस-या फोटोत तो चिखलात बसलेला दिसला होता. 

सलमानबरोबर त्याची बहीण अर्पिता खान शर्मा, मेहुणा आयुष शर्मा, भाचा आहिल आणि भाची आयत, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि त्याची तथाकथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर हे फार्महाऊस येथे होते. बाकीचे मुंबईत परत आले असले तरी यूलिया अजूनही त्याच्यासोबत आहे. यूलियाच्या इंस्टाग्राम स्टोरीजने हा खुलासा केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी युलियाने शेतीच्या अनुभवावर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. तिने लिहिले होते, ''लहान असताना मी सुटीच्या दिवसात माझ्या आजोबांच्या शेतीत बियाणे पेरणी आणि जनावरांचे रक्षण करण्यात मदत करायचो. आता मला पुन्हा ही उत्तम संधी मिळाली. मी कधी पेरणी केली नव्हती, म्हणून हा अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता.''

बातम्या आणखी आहेत...