आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ब्रीफ:‘राधे’च्या पोस्टरमध्ये सलमानसोबत झळकला मराठमोळा अभिनेता, कृतीने अरुणाचलमध्ये पूर्ण केले ‘भेडिया’चे पहिले शेड्यूल

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी राधे : योर मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला आहे. या चित्रपटात सलमान राधे नावाच्या स्पेशल कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानने दिलेला शब्द पाळत चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार असल्याचे जाहीर केले आहे. ठरलेल्या तारखेनुसार चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. भारतासह ओव्हरसीजच्या थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय. याशिवाय झी प्लेस या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट बघता येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच नवीन पोस्टरदेखील रिव्हील करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये सलमान खानसोबत मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील दिसत आहेत.

सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने ‘लवकरच येत आहे… तुमचा मोस्ट वाँटेड भाई’ असे कॅप्शन दिले आहे. सलमानसह रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, दिशा पटाणी, प्रवीण तरडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.

  • कृतीने अरुणाचलमध्ये पूर्ण केले ‘भेडिया’चे पहिले शेड्यूल

कृती सेनन हिने वरुण धवनसोबत तिचा आगामी सुपरनॅचरल चित्रपट 'भेडिया’चे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. दोघे मागील एक महिन्यापासून अरुणाचल प्रदेशात त्याचे चित्रीकरण करत होते. कृतीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वरुणसोबत हे छायाचित्र शेअर करत लिहिले मी झीरोमध्ये (अरुणाचल) 'भेडिया’चे शेड्यूल पूर्ण केले आहे. 'दिलवाले’पासून 'भेडिया’पर्यंत वरुणसोबत माझी मैत्री खूप विशेष राहिली. तुमची आठवण येत राहील. लवकरच भेटू. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'स्त्री’ फेम दिग्दर्शक अमर कौशिक करत आहेत. तो दिनेश विजानच्या हॉरर- कॉमेडी जगातील तिसरा चित्रपट (स्त्री आणि रूहीनंतर) असेल.

  • क्वारंटाइनमध्ये अर्जुन रामपाल करतोय पेंटिंग

अभिनेता अर्जुन रामपाल कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याने घरी स्वतःला क्वारंटाइन केले आङे. आता त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना क्वारंटाइन लाईफबद्दल सांगितले आहे. अर्जुनने पोस्ट केलेल्या फोटोत तो कॅनव्हासवर पेंटिंग करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, "मी क्वांरटाइनच्या काळात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. क्वारंटाइन लाइफ - दिवस - 4." अर्जुनाने क्वांरटाइनचा दुसरा दिवस पुस्तकांसह घालवला. सोशल मीडियावर पुस्तके वाचतानाचा एक फोटोही त्याने शेअर केला होता. अर्जुनने स्वतः त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिली होती.

  • ‘योद्धा’साठी शाहिदच्या तारखांची शशांकला प्रतीक्षा

'धडक’ फेम दिग्दर्शक शशांक खेतान यांचा आगामी चित्रपट 'योद्धा’ आहे. या चित्रपटासाठी निर्माते खूप काळापासून शाहिद कपूरशी संपर्क साधत आहेत. याबाबत शशांक सांगतात की, आम्ही शाहिदसोबत चित्रपटांच्या तारखांवर काम करत आहोत. हा एक अॅक्शन चित्रपट असून महामारीच्या काळात त्याचे चित्रीकरण करणे सोपे नसेल. यामुळे आम्ही सर्व काही व्यवस्थित होण्याची वाट बघतोय. सध्या आम्ही मुंबईतही चित्रीकरणही करू शकत नाही. आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण अनेक देशांत करण्याचे नियोजन केले आहे. शाहिद सध्या त्याच्या डिजिटल डेब्यू सिरीजचे चित्रीकरण करत आहे, तर शशांक लवकरच विकी कौशलसोबत त्याचा आगामी चित्रपट सुरू करणार आहे.

  • गँगस्टरच्या भूमिकेसाठी 25 ते 30 सिगारेट ओढायचो : पार्थ समथान

पार्थ समथान एकता कपूरची वेब सिरीज 'मैं हीरो बोल रहा हूं’ मध्ये गँगस्टरच्या भूमिकेत दिसेल. तो सांगतो, मी आयुष्यात कधीच एवढ्या सिगारेट ओढल्या नव्हत्या. मात्र या सिरीजसाठी ओढाव्या लागल्या. भूमिकेसाठी मला हार्डकोअर स्मोकर व्हायचे होते. माझ्या बहुतांश दृश्यांत मी सिगारेट ओढताना दिसतो. मी एका दिवसात जवळपास 25-30 सिगारेट ओढायचो. सर्वात कठीण होते सिरीज संपल्यानंतर ही वाईट सवय साेडणे.

बातम्या आणखी आहेत...