आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अभिनेता सलमान खान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये अडकला आहे. तिथे तो काहीशा वेगळ्या पद्धतीने आयसोलेटेड आयुष्याचा आनंद घेत आहेत. त्याची झलक त्याच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. अलीकडेच तो घोड्याचा चारा खाताना आणि त्याच्याशी बोलताना दिसला होता. आता त्याने त्याचा डेब्यू चित्रपट असलेल्या 'मैंने प्यार किया'मधील काचेवरील लिपस्टिकचा सीन रिक्रिएट करुन लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
ही पोस्ट शेअर करताना सलमानने लिहिले की, 'जर आता मैंने प्यार किया रिलीज झाला असता तर, हॅपी ईस्टर'. बरे राहा सुरक्षित राहा.' सलमानने चित्रपटातील जो सीन रिक्रिएट केला त्यामध्ये भाग्यश्री सलमानचे घर सोडून जाताना त्याच्यासाठी एक पत्र लिहून ठेवते, त्यात लिहिले असते, 'प्रेम.. तुम्हारे सवालों का जवाब शायद मैं नहीं हूं, प्यार की इस निशानी को अपने हाथों से मिटा देना, मैं इसकी हिम्मत नहीं जुटा पाई, नहीं जुटा पाई'
View this post on InstagramA post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Apr 12, 2020 at 2:10am PDT
सलमानने रिक्रिएट केलेल्या सीनमध्ये तो लिपस्टिकचा डाग सॅनिटाइजर टाकून रुमालाने पुसताना दिसतोय. याच्या बॅकग्राऊंडमध्ये भाग्यश्रीचा आवाज ऐकू येतोय. अशाप्रकारे सलमानने कोरोनव्हायरस टाळण्यासाठी लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. मुळ चित्रपटात सलमान काचेवर लावलेले पत्र वाचतो आणि इमोशनल होऊन काचेवरील भाग्यश्रीच्या ओठांचे चुंबन घेतो, असे दाखवण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये वेळ घालवत आहे. तो येथे काही दिवसांसाठी गेला होता पण लॉकडाऊनमुळे तो त्याच्या मुंबईतील घरी, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये परतू शकला नाही. अलीकडेच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो घोड्याचा चारा स्वतः खाताना दिसला होता. या व्हिडिओसोबत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'ब्रेकफास्ट विथ माय लव्ह'.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.