आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू साँग:सलमान खानने ईदच्या दिवशी रिलीज केला 'भाई भाई' म्युझिक अल्बम, गाण्यातून दिला एकात्मतेचा संदेश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केवळ 12 तासांत गाण्याला 46 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ईदच्या निमित्ताने सुपरस्टार सलमान खानने त्याचा 'भाई-भाई' हा नवीन म्युझिक अल्बम यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे. या गाण्याच्या माध्यमातून सलमानने हिंदू -मुस्लिम भाऊ भाऊ असल्याचे म्हणत एकात्मतेचा संदेश दिला आहे. साजिद-वाजिद यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे आणि स्वरसाज सलमानने चढवला आहे. गाण्याचे बोल सलमान आणि दानिश सब्री यांनी लिहिले आहेत. तर गाण्यातील रॅप रुहान अर्शदने लिहिला आहे.

सोमवारी रात्री उशिरा या गाण्याची लिंक सोशल मीडियावर शेअर करताना सलमानने लिहिले की, "मी तुमच्या सर्वांसाठी काहीतरी तयार केले आहे, बघून सांगा कसे वाटले. तुम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा."

12 तासांत 46 लाखांहून अधिक व्ह्यूज

सलमानचे नवीन गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. केवळ 12 तासांत गाण्याला 46 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्यूब युजर्स कमेंट बॉक्समध्ये सलमानचे कौतुक करत आहेत. काही यूजर्सनी सलमानला रिअल एंटरटेनर म्हटले आहे, तर काहींनी 'भाई भाई' गाण्याच्या माध्यमातून महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हटले आहे. भारताला आज या गाण्याची मोठी गरज आहे.

एका महिन्यात सलमानचे तिसरे गाणे

सलमानने लॉकडाऊनच्या काळात म्हणजे 18 एप्रिल रोजी आपले यूट्यूब चॅनल तयार केले होते. आणि आतापर्यंत दर्शित केलेले हे त्याचे तिसरे गाणे आहे. या आधी प्यार करोना आणि तेरे बिना हे म्युझिक अल्बम त्याने लाँच केले होते.  'प्यार करोना' या गाण्याला एक कोटी व्ह्यूज मिळाले तर 'तेरे बिना' या गाण्याला 2.96 कोटी व्ह्यूज मिळाले. त्याचे पहिले गाणे 20 एप्रिल रोजी आले होते. गेल्या महिन्याभरात सलमानच्या चॅनलवर सब्सक्राइबर्सची संख्या 15 लाखांहून अधिक झाली आहे. त्याच्या चॅनलवर एकुण व्ह्यूज हे 5.5 कोटींहून अधिक आहेत.

बातम्या आणखी आहेत...