आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा नवा आशियाना:सलमान खानने मुंबईत भाड्याने घेतले घर, महिन्याचे भाडे आहे तब्बल 8 लाख 25 हजार रुपये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाड्याचे घर सलमानने ऑफिससाठी घेतले आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान मुंबईतील वांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. अलीकडेच सलमानने वांद्र्यातच एक डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतल्याचे वृत्त आहे. सलमान खान या घरात राहायला जाणार नाहीये. तर ऑफिससाठी त्याने हे अपार्टमेंट घेतले आहे. अलीकडेच सलमान खान वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर हा भाडेकरार झाला आहे.

वृत्तानुसार काही दिवसांपूर्वीच सलमानने या घराचा भाडेकरार केला आहे. हा डुप्लेक्स फ्लॅट वांद्रे येथील मकबा हाईट्सच्या 17 आणि 18 व्या मजल्यावर आहे. हा फ्लॅट बाबा सिद्दीकी आणि जीशान सिद्दीकी यांच्या मालकीचा आहे. या दोघांमध्ये 11 महिन्यांचा भाडेकरार झाला आहे. या फ्लॅटमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून हा फ्लॅटचा 2 हजार 265 चौरस फूट इतका आहे. या डुप्लेक्स फ्लॅटसाठी सलमान महिन्याकाठी तब्बल 8 लाख 25 हजार रुपये भाडे देतोय. या फ्लॅटचा वापर सलमान खानच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या लेखकांसाठी केला जाणार आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, सध्या तो बिग बॉस 15 च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहे. याशिवाय त्याचा 'अंतिम: द फायनल ट्रूथ' हा चित्रपट येत्या 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याचा मेहुणा आयुष शर्मा देखील दिसणार आहे. याशिवाय तो कतरिना कैफसोबत 'टायगर 3'च्या चित्रीकरणात बिझी आहे. 'कभी ईद कभी दिवाली' आणि 'किक 2' हे देखील त्याचे आगामी चित्रपट असून तो शाहरुख खानच्या 'पठान'मध्ये कॅमिओ साकारणार आहे.

बातम्या आणखी आहेत...