आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅक्शनचा एक्स्ट्रा डोस:'राधे' चित्रपटासाठी सलमानने साऊथ कोरियन स्टंटमन क्वोन ताईची केली निवड, हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार ताई

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताई या चित्रपटातील काही खास स्टंट सीनचे दिग्दर्शन करणार आहेत.

लॉकडाऊन दरम्यान जवळपास 7 महिने शूटिंगपासून दूर असलेल्या सलमान खानने आता 'राधे'चे शूटिंग जवळजवळ पूर्ण केले आहे. आता केवळ चित्रपटातील हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीन शूट करण्यात येणार आहे. या कामासाठी सलमानने क्वोन ताई होची निवड केली आहे. ताई या चित्रपटातील काही खास स्टंट सीनचे दिग्दर्शन करणार आहेत.

रणदीप आणि सलमान यांच्यात असेल अ‍ॅक्शन सीन

ताई हो हे सीन शूट करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा भारतात आले होते. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, प्रभू देवाला काही स्लीक आणि काही वेगवान अ‍ॅक्शन सीन्स चित्रीत करायचे होते. या दृश्यात सलमान म्हणजेच राधे आणि गोअन ड्रग माफियाचा प्रमुख रणदीप यांच्या फाइट असेल.

ताई सलमानबरोबर दोन हात करताना दिसेल
ताई महिनाभर भारतात वास्तव्याला होते. वांद्रे स्टुडिओमध्ये फाइट सीनचे चित्रीकरण करण्यात आले. सोबतच ताई सलमानबरोबर दोन हात करताना दिसणार आहे. या दृश्याच्या चित्रिकरणासंदर्भातील वृत्तानुसार, डिम लाइट आणि धुरामध्ये हे सीन शूट करण्यात येतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser