आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी सलमानचा जबाब नोंदवला आहे. वृत्तानुसार, सलमानने पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याला धमकी मिळाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 'माझे कोणाशीही वैर नाही आणि मला कोणीही धमकावलेले नाही,' असे सलमानने पोलिसांना सांगितले आहे.
वांद्रे पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर सलमान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला रवाना झाला आहे. येथे त्याचे 25 दिवसांचे वेळापत्रक आहे. सलमान हैदराबादला पोहोचण्यापूर्वीच बॉडीगार्ड शेरा आणि त्याची टीम तिथे पोहोचली.
मला एकही कॉल आला नाही
रिपोर्ट्सनुसार, वांद्रे पोलिसांनी सलमानला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्सबद्दल विचारणा केली. यावर सलमान म्हणाला, 'मला धमकीच्या पत्राबद्दल कोणावरही संशय नाही. सध्या माझे कोणाशीही वैर नाही. मी 2018 मध्ये लॉरेन्सबद्दल ऐकले कारण नंतर त्याने मला धमकावले होते. पण मी गोल्डी आणि लॉरेन्सला ओळखत नाही,' असा जबाब सलमानने पोलिसांकडे नोंदवला आहे.
धमकीबद्दल बोलताना सलमानने पुढे पोलिसांना सांगितले- 'माझे अलीकडच्या काळात कोणाशीही भांडण किंवा वाद झालेला नाही. मला कोणताही धमकीचा मेसेज किंवा कॉल आलेला माझे वडील सकाळी फिरायला गेले असताना त्यांना पत्र मिळाले होते,' असे सलमानने सांगितले.
पोलिसांच्या तपासाला आला वेग
मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. 8 पथके सातत्याने या प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहेत. वांद्रे परिसरात बसवण्यात आलेल्या 200 सीसीटीव्हींच्या तपासणीनंतर काही संशयित सापडले आढळले असली तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपासण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचाही समावेश आहे.
चिट्टीचा तपास सुरू आहे
सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्राच्या शेवटी जीबी आणि एलबी लिहिले असल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे. याचा अर्थ गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई असू शकतो, परंतु हे पत्र खरंच बिश्नोई टोळीशी संबंधित आहे की कोणीतरी मस्करी केली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
असे मिळाले धमकीचे पत्र
रविवारी सकाळी जेव्हा सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले होते, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आले. फिरल्यानंतर सलीम खान यांना एक अनोळखी पत्र मिळाले होते, ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलीम खान, सलमान खान तुमचा मूसेवाला करु असा मजकूर त्या पत्रात लिहिला होता. यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अलीकडेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव याप्रकरणी पुढे आले होते. काळवीट प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.