आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारीनंतरच ‘राधे’ सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार:सलमान खानवर नाराज आहेत चित्रपटगृहांचे मालक; भाईजानने मागितली माफी, म्हणाला - 'मला माफ करा'

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सविस्तर

सलमान खानचा ‘राधे’ देशभरातील चित्रपटगृहात कधी रिलीज होणार, याविषयी कोणतीच माहिती समोर आली नाही. मात्र महामारी संपताच ‘राधे’ चित्रपटगृहातच रिलीज होणार असल्याची घोषणा सलमानने नुकतीच केली आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे काही चित्रपटगृह मालक नाराज आहेत. हा मोठा चित्रपट आहे, यामुळे चित्रपटगृह मालकांचा फायदा झाला असता, असे काहींचे म्हणणे आहे. देशात जिथे लॉकडाउन सुरू आहे अशा शहरातील चित्रपटगृहे वगळता मोजक्या चित्रपटगृहांत 13 मे रोजी ‘राधे’ चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. ईदच्याच दिवशी आपला चित्रपट रिलीज करण्याची चाहत्यांना दिलेली कमिटमेंट तर सलमान खानने पूर्ण केली. परंतु लॉकडाउनमुळे ज्या थिएटरमध्ये त्याचा चित्रपट रिलीज होऊ शकणार नाही, अशा थिएटर मालकांची त्याने माफी मागितली आहे. पत्रकारांशी झूमद्वारे बोलताना त्याने ही माफी मागितली.

  • सलमान म्हणाला मी माफी मागतो

सलमान खान म्हणाला, 'जे थिएटर मालक माझा चित्रपट रिलीज करून बिझनेस कमवण्याच्या आशेवर होते, अशा सर्व थिएटर मालकांची मी माफी मागतो. देशात सुरू असलेली ही महामारी लवकरात लवकर संपवून आम्ही देशभरातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज व्हावा यासाठी बराच काळ वाट पाहिली. पण तसे होऊ शकले नाही. माहित नाही आता हे सगळे कधी नीट होईल.'

बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबतही सलमान म्हणाला, 'राधे चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शून्य होणार आहे. माझ्या कोणत्या ही चित्रपटासाठी हे कमीच असणार. भारत आणि इतर देशात सामान्य चित्रपटाच्या तुलनेत खूप कमी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होतेय. त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच कमी होणार आहे.'

  • सलमानवर नाराज आहेत चित्रपटगृहांचे मालक

पीव्हीआर आणि कार्निव्हल सिने चेन सारख्या मोठ्या मल्टिप्लेक्सच्या मालकांनी निर्मात्यांच्या या निर्णयावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ट्रेड तज्ञांच्या मते, मल्टिप्लेक्स मालिक निर्मात्यांच्या या निर्णयावर खुश नाहीत. कारण चित्रपटगृह उघडण्यात अजून तीन ते चार महिन्याचा वेळ आहे, तोपर्यंत चित्रपट जुना होईल. दुसरीकडे निर्मात्यांनी ओटीटीनंतर थिएटर्समध्ये रिलीज करण्याचे आधी म्हटले होते.

  • रिलीज झाल्यानंतरही होणार फायदा

यावर ‘दिव्य मराठी’ने पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि कार्निव्हलच्या अधिकाऱ्यांना एका प्रश्न विचारला. कोरोना महामहारीमध्ये जर राधे ईदनंतर रिलीज झाला तर चित्रपटगृहांचा कसा फायदा होईल ? यावर िदल्लीच्या डिलाइट सिनेमाचे मालक आरके मेहरोत्र म्हणाले, ‘राधे’ नंतर रिलीज झाला तर चित्रपटगृहांना फायदा होईल. कारण महामारी पूर्ण संपल्या-संपल्याच चित्रपटगृहात नवा चित्रपट रिलीज होणार नाही. परिस्थिती सामान्य होण्यात दोन ते तीन आठवडे लागतीलच. त्यामुळे ‘राधे’ सारख्या चित्रपटामुळे फायदा होईलच.

  • चित्रपट चांगला असला आणि सोशल मीडियावर आवड निर्माण झाली तर प्रेक्षक थिएटरमध्ये जातील : विषेक

वितरक आणि थिएटर मालक विषेक चौहानचे म्हणणे आहे, सिनेमा चांगला असला आणि सोशल मीडियावर याविषयी उत्सुकता निर्माण झाली तर लोक नक्कीच महामारीनंतरदेखील चित्रपटगृहात पाहायला जातील. मात्र चित्रपट सरासरी गाठू शकला तर फक्त सलमानचे हार्डकोर चाहतेच थिएटरमध्ये जातील. बातमी लिहेपर्यंत झी स्टुडिओजकडून भारतात किती स्क्रीनवर रिलीज होईल याचा आकडा आला नव्हता.

  • 'वीर'नंतर 100 कोटीत सहभागी न होणारा पहिला चित्रपट ठरू शकतो

त्याचबरोबर व्यापारी पंडितांच्या मते, सलमानच्या 'वीर' नंतर हा कदाचित पहिला चित्रपट ठरेल जो कदाचित 100 कोटींच्या क्लबमध्ये जाऊ शकणार नाही. कारण देशातील थिएटर सध्या बंद आहेत. शिवाय “वीर” चित्रपटाची कमाई फक्त 70 कोटी 65 लाख रुपये होती. त्यामुळे हादेखील याच्या आसपासच कमाई करु शकेल, असाज अंदाज लावला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...