आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. या ट्रेलर लाँच इव्हेंटला चित्रपटातील सगळे कलाकार एकत्र आले होते. या इव्हेंटमध्ये सलमानने चक्क शर्टलेस होत त्याचे अॅब्स दाखवले. खरं तर त्याचे अॅब्स खोटे असून VFX द्वारे बनवण्यात आल्याचा दावा अनेकांनी केला होता. पण आता सलमानने यावर सडेतोड उत्तर दिले.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी सलमानने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोत सलमानने त्याची जबरदस्त बॉडी दाखवली होती. यावर सलमानचे सिक्स पॅक्स अॅब्स खोटे असल्याचे अनेकांनी म्हटले होते. तर काहींनी हे फोटोशॉप असल्याचा दावा केला होता. पण सलमानने भर कार्यक्रमात शर्टलेस होऊन टीकाकारांना उत्तर दिले.
सोशल मीडियावर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमधील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओत सलमान हा त्याच्या सिक्स पॅक्स अॅब्सबद्दल बोलताना दिसत आहे. सलमान म्हणाला, "अनेकांना माझे सिक्स पॅक्स अॅब्स फोटोशॉप आणि VFX द्वारे बनवले आहेत असे वाटते, पण आज मी तुम्हाला सत्य काय ते दाखवणार आहे," असे तो म्हणाला. त्यानंतर तो भर कार्यक्रमात शर्टलेस झाला.
चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सलमान शर्टचे बटण उघडत असताना उपस्थितीतांनी टाळ्या, शिट्या वाजवल्या. यावेळी सलमानने त्याचे सिक्स पॅक्सही दाखवत म्हटले, "तुम्हाला काय वाटते हे VFX द्वारे शक्य आहे का?"
सलमानच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने म्हटले, 'भाई सार्वजनिकरित्या आपले अॅब्स दाखवतोय. हे ओरिजिनिल असून ते VFX नाहीत.' तर आणखी एका चाहत्याने लिहिले, 'भाईजानचे अॅब्स लाइव्ह बघा, ते खरे आहेत.'
आणखी एका चाहत्याने लिहिले, 'वयाच्या 57 व्या वर्षी सार्वजनिकरित्या अॅब्स दाखवण्याची हिंमत एकट्या सलमानशिवाय इतर कोणत्याही अभिनेत्याकडे नाही.'
'किसी का भाई किसी की जान'ला मिळतोय संमिश्र प्रतिसाद
‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. एकीकडे सलमानचे चाहते चार वर्षांनंतर त्याच्या कमबॅकसाठी उत्सुक आहेत. तर काहींनी मात्र ट्रेलरमध्ये नाविन्य नसल्याचे म्हटले आहे.
हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सलमान खानसह दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, शहनाज गिल, जस्सी गिल, भूमिका चावला, पलक तिवारी आणि बॉक्सर विजेंद्र सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.