आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अंतिम'ची रिलीज डेट आली समोर:26 नोव्हेंबरला रिलीज होणार सलमान खान-आयुष शर्मा स्टारर 'अंतिम : द फायनल ट्रूथ', जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते 2' सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

सलमान खान, आयुष शर्मा स्टारर 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात थिएटर सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

सलमानने एक ट्वीट करत चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तो म्हणाला, 'अंतिमची प्रतिक्षा संपली! 26 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये बघा हा चित्रपट.' सोबतच सलमानने चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो आयुष शर्मासह दिसतोय. विशेष म्हणजे याच दिवशी जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 हा चित्रपटदेखील प्रदर्शित होतोय. म्हणजेच या दिवशी सलमान आणि जॉनच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर बघायला मिळेल.

सलमान खान आणि आयुष शर्मा, जे दोन भिन्न टोकाच्या विचारधारांनी प्रेरित; एक पोलिस आणि दूसरा गँगस्टर, ज्याची परिणति दोघांमधील भयंकर संघर्षात होते. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' एका गँगस्टरची कहाणी आहे, जो कोणत्याही परिस्थितीत एका पोलिसावर विजय मिळवू इच्छितो, जो त्याच्या प्रत्येक योजनांना विफल करण्याच्या योजना बनवत आहे. चित्रपटात सलमान पोलिस अधिका-याच्या तर आयुष गँगस्टरच्या भूमिकेत दिसतील.

हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशभरात हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि उडिया भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सची असून दिग्दर्शन महेश मांजेरकर यांचे आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक टीजर रिलीज झाला होता. यात सलमानसह आयुष देखील शर्टलेस अवतारात दिसला होता.

शेवटचा 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई'मध्ये दिसला होता सलमान
सलमान खान शेवटचा 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई'मध्ये दिसला होता. पण त्याचा हा चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाला. 'राधे' आणि 'अंतिम'नंतर सलमान 2021 मध्ये 'पठान' आणि 'लाल सिंह चड्ढा'मध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. तर आयुष शर्माने 2018 मध्ये लवयात्री या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, पण त्याचा पदार्पणातील चित्रपट फ्लॉप ठरला होता.

बातम्या आणखी आहेत...