आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरसीज बॉक्स ऑफिस कलेक्शन:सलमान खानच्या 'राधे'ने पहिल्या दिवशी कमावले 4.4 कोटी, 4.2 मिलियन व्ह्यूजसह ठरला सर्वाधिक बघितला गेलेला चित्रपट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेमध्ये पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे 40 लाख रुपयांची कमाई केली

सलमान खान स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटे़ड भाई' हा चित्रपट 13 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सिनेमागृहांशिवाय ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला नाही. मात्र, या चित्रपटाला परदेशात चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापार विश्लेषकांच्या मते, राधेचे पहिल्या दिवशीचे परदेशातील बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास 4.4 कोटी रुपये झाले आहे.

अमेरिकेमध्ये पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे 40 लाख रुपयांची कमाई केली
व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चित्रपटाच्या डे-वन कलेक्शनची माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टनुसार, कोरोनाच्या काळातही पहिल्या दिवशी 'राधे'ने ओव्हरसीज मार्केटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाने ऑस्ट्रेलियामध्ये 35.71 लाख आणि न्यूझीलंडमध्ये 5.90 लाख रुपये कमवले आहेत. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, या चित्रपटाचे गल्फ मार्केटमध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 2.9 कोटी इतके आहे. याशिवाय विश्लेषक गितेश पंड्या यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेमध्ये पहिल्या दिवशी या चित्रपटाने सुमारे 40 लाखांची कमाई केली आहे. विकेण्डला हा चित्रपट आणखी चांगला गल्ला जमवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पहिल्याच दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेकॉर्ड बनवला
ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर ‘पे पर व्ह्यू’ सेवेअंतर्गत हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'राधे'ने डिजिटल रिलीजच्या पहिल्याच दिवशी विक्रम नोंदविला आहे. 'राधे' हा रिलीजच्या दिवशी 4.2 मिलियन व्ह्यूजसह ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर सर्वाधिक बघितला गेलेला चित्रपट ठरला आहे. यासाठी सलमाननेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.

हा चित्रपट प्रदर्शित होताच झी 5 चा सर्व्हर क्रॅश झाला होता
'राधे' हा चित्रपट सिनेमागृहांव्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्म झी-प्लेक्ससह झी 5 वरही प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही तासांतच झी 5 चा सर्व्हर क्रॅश झाला होता. चित्रपटाच्या प्रतीक्षेत असलेल्या यूजर्सनी झी 5 वर मोठ्या प्रमाणात स्ट्रीम करणे सुरु केले. एवढे यूजर्स प्लॅटफॉर्मसाठी हाताळणे कठिण झाले आणि काही काळासाठी सर्व्हर क्रॅश झाला. झी 5 वर हा चित्रपट चालू नसल्यामुळे यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर त्याबद्दल तक्रारी करण्यास सुरवात केली. पण, झी 5 टीमने तत्काळ परिस्थिती सांभाळली आणि सुमारे एक तासानंतर अॅपने पुन्हा कार्य करणे सुरू केले. प्रभू देवा दिग्दर्शित ‘राधे’ चित्रपटात सलमानशिवाय दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा, गोविंद नामदेव आणि गौतम गुलाटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...