आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा 'राधे' झाला पास:सलमान खान स्टारर 'राधे'ला CBFC ने दिले UA प्रमाणपत्र, कोणत्याही कटविना चित्रपट 13 मे रोजी होणार थिएटरमध्ये प्रदर्शित

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाचा कालावधी 1 तास 54 मिनिटे इतका आहे.

सलमान खान स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट यंदा ईद मुहूर्तावर म्हणजे 13 मे रोजी जगभरातील थिएटरसह 'पे-व्ह्यू-व्ह्यू' सर्व्हिस अंतर्गत झी प्लेक्सवर रिलीज होतोय. आता निर्मात्यांना ‘राधे’साठी सेन्सॉरचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने चित्रपटाच्या थिएटर स्क्रिनिंगसाठी निर्मात्यांना UA प्रमाणपत्र दिले आहे.

'राधे' सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी योग्य : बोर्ड
सेन्सॉर बोर्डाच्या म्हणण्यानुसार, 'राधे' हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसह अगदी योग्य आहे. 'राधे' या चित्रपटाचा कालावधी 1 तास 54 मिनिटे इतका आहे. हा चित्रपट सलमानच्या आजवरच्या कमी कालावधीच्या चित्रपटांपैकी एक आहे. सलमानच्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत यापूर्वी केवळ दोन चित्रपट 2 तासांपेक्षा कमी लांबीचे होते. हे चित्रपट म्हणजे 2009 मध्ये आलेला 'मैं और मिसेज खन्ना' आणि 2007 मध्ये आलेला 'मेरीगोल्ड' हे होते.

प्रभुदेवा दिग्दर्शित ‘राधे’ चित्रपटाच्या ट्रेलरसह ‘सिटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. ट्रेलरमध्ये सलमानचे दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन पाहायला मिळाला. चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन्ही गाण्यांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

रिहर्सलविना सलमान-रणदीपने शूट केला वॉशरूम फाइट सीक्वेन्स
या चित्रपटात सलमान आणि रणदीप यांच्यात वॉशरूम फाइट सीन देखील आहे. रणदीपने याचा खुलासा केला आणि सांगितले की, "सलमान आणि माझ्यात वॉशरूम फायट सीक्वेन्स ही प्रभु सरांची कल्पना आहे आणि कोरियन अ‍ॅक्शन डायरेक्टर मियॉंग हेन्ग यांनी ऑन स्पॉट याचे दिग्दर्शन केले आहे. आम्ही त्याची रिहर्सल केली नाही."

40 ओव्हरसीज देशांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार 'राधे'
हा चित्रपट 40 ओव्हरसीज देशांतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युरोप टेरेटरीतील हे देश असतील. इंग्लंडमध्ये गेल्या वर्षीपासून ते आतापर्यंत लॉकडाऊनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट असेल.

स्पेशल कॉपच्या भूमिकेत दिसणार सलमान खान

चित्रपटात सलमान खान स्पेशल कॉप राधेच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत सुरु असलेला अंमली पदार्थांचा व्यापार आणि गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रित करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. राधेची काम करण्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे. अगदी 'वाँटेड' (2009) चित्रपटातील पात्रासारखीच. ट्रेलरमध्ये सलमान 'वाँटेड'मधील गाजलेला डायलॉग 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपनी आपकी भी नहीं सुनता' म्हणताना दिसला आहे.

अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेल्या ट्रेलरमध्ये सलमान गुन्हेगारांना सळो की पळो करताना दिसतोय. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा पाटनी आहे. रणदीप हूडा या चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे. गोविंद नामदेव आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.

बातम्या आणखी आहेत...