आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला धमकीचे पत्र खुद्द लॉरेन्सने लिहिले:अटकेतील शूटर सौरभ महाकालचा दावा- हे पत्र गोल्डी ब्रारने सलीम खान यांना सोपवले

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलीम खान मॉर्निंग वॉकला जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना हे पत्र दिले. त्यात फक्त दोन ओळींचा संदेश होता. पत्राच्या शेवटी उल्लेख असलेले G.B आणि L.B. हे गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावांचे शॉर्ट फॉर्म असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्सचा जवळचा सहकारी सौरभ महाकाळ याची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक पुण्यात पोहोचले होते. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, सलमान खानला हे पत्र गँगस्टर लॉरेन्सच्या बाजूने पाठवण्यात आले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांची 6 पथके देशाच्या विविध भागात रवाना झाली आहेत.

जालोर येथून तीन जण मुंबईत आले

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्सनेच सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र लिहिले. लॉरेन्सच्या टोळीतील तीन जण राजस्थानातील जालोर येथून मुंबईत पत्र टाकण्यासाठी आले होते. धमकीचे पत्र दिल्यानंतर या तिघांनी आरोपी सौरभ महाकाळचीही भेट घेतली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभने हे पत्र गोल्डी ब्रारच्या माध्यमातून सलीम खान यांना पोहोचवल्याचेही सांगितले. मुंबई पोलिसांनी पुढे सांगितले की, गुन्हे शाखेने पत्र पाठवणाऱ्यांची ओळख पटवली आहे. त्यांच्याशी संबंधित काही सुगावाही सापडला आहे. लवकरच ते पकडले जातील.

विक्रम हा लॉरेन्सच्या जवळचा आहे

विक्रमजीत बराड हा राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी आहे. तो राजस्थानचा कुख्यात गुंड आनंदपाल सिंग याच्या जवळ होता, पण त्याच्या एन्काउंटरनंतर तो लॉरेन्सच्या टोळीत सामील झाला. आता तो लॉरेन्सच्या जवळची व्यक्ती झाला आहे आणि त्यामुळेच त्याचे सर्व काम तो करत असतो. बराड याच्यावर दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

जोधपूर कोर्टात गँगस्टर लॉरेन्सने सलमानला मारणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. (फाइल फोटो).
जोधपूर कोर्टात गँगस्टर लॉरेन्सने सलमानला मारणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. (फाइल फोटो).

माझे कुणाशीही वैर नाही

याप्रकरणी पोलिसांनी सलमानचा जबाब नोंदवला आहे. वृत्तानुसार, सलमानने पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याला धमकी मिळाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 'माझे कोणाशीही वैर नाही आणि मला कोणीही धमकावलेले नाही,' असे सलमानने पोलिसांना सांगितले आहे.

रिपोर्ट्सनुसार, वांद्रे पोलिसांनी सलमानला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्सबद्दल विचारणा केली. यावर सलमान म्हणाला, 'मला धमकीच्या पत्राबद्दल कोणावरही संशय नाही. सध्या माझे कोणाशीही वैर नाही. मी 2018 मध्ये लॉरेन्सबद्दल ऐकले कारण नंतर त्याने मला धमकावले होते. पण मी गोल्डी आणि लॉरेन्सला ओळखत नाही,' असा जबाब सलमानने पोलिसांकडे नोंदवला आहे.

धमकीबद्दल बोलताना सलमानने पुढे पोलिसांना सांगितले- 'माझे अलीकडच्या काळात कोणाशीही भांडण किंवा वाद झालेला नाही. मला कोणताही धमकीचा मेसेज किंवा कॉल आलेला माझे वडील सकाळी फिरायला गेले असताना त्यांना पत्र मिळाले होते,' असे सलमानने सांगितले.

पोलिसांच्या तपासाला आला वेग

मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. वांद्रे परिसरात बसवण्यात आलेल्या 200 सीसीटीव्हींच्या तपासणी केली. तपासण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचाही समावेश आहे.

असे मिळाले धमकीचे पत्र

रविवारी सकाळी जेव्हा सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले होते, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आले. फिरल्यानंतर सलीम खान यांना एक अनोळखी पत्र मिळाले होते, ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलीम खान, सलमान खान तुमचा मूसेवाला करु असा मजकूर त्या पत्रात लिहिला होता. यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सलमान आणि सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राचा फोटो.
सलमान आणि सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राचा फोटो.

अलीकडेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव याप्रकरणी पुढे आले होते. काळवीट प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काळवीट प्रकरणी सलमानला धमकी देण्यात आली होती

लॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो, त्यामुळे त्याची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला मारण्याची धमकी लॉरेन्सने दिली होती.

जोधपूरमध्ये सलमानला मारण्याचा होता कट

2008 मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले होते. तो असेही म्हणाला होता की, 'मी अजून काही केले नाही, पण जेव्हा मी सलमान खानला मारेन तेव्हा मग कळेल. सध्या मला अनावश्यक गोष्टींमध्ये ओढले जात आहे.

हैदराबादसाठी रवाना होताना सलमान खान
हैदराबादसाठी रवाना होताना सलमान खान

हैदराबादमध्ये शूटिंग करतोय सलमान

सलमान खान नुकताच अबुधाबीच्या यास बेटावर आयफा अवॉर्ड्सचा होस्ट म्हणून गेला होता. याशिवाय तो आता 'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो हैदराबाद येथे रवाना झाला आहे. येथे त्याचे 25 दिवसांचे शेड्यूल असेल. त्याच्या सुरक्षेसाठी सेटवर पोलिसांची एक टीमसुद्धा तिथे तैनात आहे. याशिवाय 'टायगर' मालिकेतील तिसरा चित्रपट 'टायगर 3'मध्येही तो काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसणार आहे. यासोबतच तो आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि शाहरुख खानच्या 'पठाण'मध्येही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...