आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीही अपडेट:सलमान खान होस्ट करणार 'बिग बॉस 14', निया शर्मा, विवयन डिसेना आणि अध्ययन सुमनला शोची ऑफर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस 13 ला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर आता मेकर्सने रियलिटी शो बिग बॉस 14 ची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत सर्वच सीजनमध्ये सर्वात जास्त काळ सुरू असलेल्या लास्ट सीजनने टीआरपीसह अनेक मोठे रेकॉर्ड तोडले आहेत. आता फॅन्स पुढच्या सीजनसाठी एक्सायटेड आहेत. वृत्त आहे की, या सीजनलाही सलमान खानच होस्ट करणार आहे. आता कंटेस्टेंटच्या नावावर चर्चा सुरू आहे. तर काही सेलेब्सला पहिलेच शोची ऑफर मिळाली आहे.

अलीकडेच मुंबई मिररने सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, सलमान खान बिग बॉस 14 चा होस्ट असेल. तो आता बिग बॉसचा भाग बनला आहे. सध्या, शोच्या थीम आणि स्पर्धक आणि फॉर्मेटवर निर्मात्यांची चर्चा सुरू आहे. टीव्ही अभिनेत्री निया शर्मा, अध्ययन सुमन आणि विवयन डीसेना यांना शोमध्ये स्पर्धक होण्यासाठी संपर्क साधण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. निर्माता दोन महिन्यांत हा शो सुरू करणार आहेत.

View this post on Instagram

I’m ‘Saree’ if I ever hurt you unknowingly!

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on Jul 14, 2020 at 4:06am PDT

या सेलिब्रिटींच्या नावांवर निर्मात्यांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. पूर्वी भाभीजी घर पर है ची शुभांगी अत्रे आणि चाहत खन्ना यांनाही संपर्क साधला होता पण दोघींनीही या कार्यक्रमाचा भाग होण्यास नकार दिला. शुभांगीने कामामुळे शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. तर चाहतने आपल्या प्रायव्हसीमुळे सहाव्यांदा ऑफर नाकारली आहे. खरंतर वादामुळे चाहत खन्नाला या शोमध्ये येण्यासाठी परफेक्ट मानले जाते. 

लॉकडाऊन कनेक्शन दाखवणार 
नुकत्याच आलेल्या पिंकविलाच्या रिपोर्टनुसार या सीजनमध्ये प्रेक्षकांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. देशातील सद्य परिस्थिती लक्षात घेता निर्मात्यांनी 'बिग बॉस 14' मधील लॉकडाऊनचा तडका लावण्याचा प्लान बनवला आहे. या शोचे नाव 'बिग बॉस 14 लॉकडाउन एडिशन' असणार असल्याचेही वृत्त आहे. मागील सीजनचा प्रीमियर 29 सप्टेंबर रोजी होता, परंतु यावर्षी हा शो उशिरा येण्याची शक्यता आहे.

बिग बॉस 13 ने हाय वॉल्टेज ड्रामामुळे बर्‍याच प्रेक्षकांना आकर्षित केले. हा शो त्याच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात जास्त काळा चालणारा सीजन ठरला. 29 सप्टेंबरला झालेल्या प्रीमियरनंतर शोचा फिनाले 15 फेब्रुवारीला झाला होता. शोच्या फिनाले डेटमध्ये दोनदा बदल करण्यात आले. या हंगामा रश्मी देसाई यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत होते तेथे दुसरीकडे असीम आणि सिद्धार्थची भांडण प्रेक्षकांनाही एंगेज ठेवत होती. आता बिग बॉस 14 पूर्वीपेक्षा अधिक चांगले करण्यासाठी निर्माता काय नवीन कल्पना आणता हे पाहावे लागेल.