आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म अपडेट:'अंतिम'चे चित्रीकरण पूर्ण करुन सलमान खान मार्चपासून सुरु करणार 'टायगर 3'चे चित्रीकरण, पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत शेअर करणार स्क्रिन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान मार्चपासून 'टायगर 3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'अंतिम : द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान फेब्रुवारीपर्यंत महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम'चे शूटिंग पूर्ण करेल आणि त्यानंतर तो मार्चपासून 'टायगर 3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमान सप्टेंबरपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. या चित्रपटात सलमान अविनाशसिंग राठौरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सलमानसोबत दिसणार आहे. या चित्रपटातून ती झोयाच्या भूमिकेतून परतत आहे.

'टायगर 3' च्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर शाहरुख खान या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा ऐकिवात आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार की पुढील वर्षी याची माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

सलमानने सांगितली 'राधे'ती रिलीज डेट
अलीकडेच सलमानने त्याचा राधे हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. यावर्षी ईदचा मुहूर्त साधत सलमान त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. 'सर्व चित्रपटगृह मालकांना प्रतिसाद देण्यासाठी मला इतका वेळ लागल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या काळातील हा एक मोठा निर्णय आहे. थिएटर मालक आणि चित्रपट वितरक सध्या ज्या आर्थिक समस्येचा सामना करत आहेत ती परिस्थिती मी समजू शकतो. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी मी राधे हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. 2021 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल, इंशाल्लाह. यावर्षी ईदला थिएटरमध्ये राधेचा आनंद घ्या,' अशा आशयाची पोस्ट सलमानने शेअर केली आहे.

सलमान खानची निर्मिती आहे 'राधे'
सलमानच्या या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. परंतु सलमानने ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटर मध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे. ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले असून, यामध्ये सलमान खानसह दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जॅकी श्रॉफ, जरीना वहाब आणि रणदीप हुडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. 'राधे' या चित्रपटाची निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांचे बॅनर सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स आणि रील लाइफ प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...