आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी प्रोजेक्ट:प्राइम व्हिडिओसाठी '92 डेज' या वेब शोची निर्मिती करणार सलमान खान, मुख्य भूमिकेत दिसणार मेहुणा आयुष शर्मा

अमित कर्ण10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिग्दर्शक मिळून करतील प्रवासावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन..

कोरोना काळात एकीकडे अजय देवगण आणि अक्षय कुमार सारख्या मोठ्या कलाकारांचे चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. दुसरीकडे शाहरुख खान सारखे मोठे कलाकार या माध्यमासाठी आपल्या बॅनरखाली चित्रपटांची निर्मिती करत आहेत. आता या यादीत सलमान खानचेही नाव जाेडले गेले आहे. एकीकडे 13 मे राेजी त्याचा 'राधे : योर मोस्ट वाँडेट भाई’ डिजिटलवर प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे आणखी एका ओटीटी प्लेटफॉर्मसाठी तो एसकेएफ फिल्म्सच्या बॅनर खाली '92 डेज’ या वेब शोची निर्मितीदेखील करत आहे.

  • ऑक्टोबरपर्यंत 'टाइगर 3'चे शूटिंग करणार सलमान

दुसरीकडे सलमानच्या जवळच्या लोकांच्या मते, यात सलमान काम करणार नाही, कारण सध्या त्याचेच बरेच प्रकल्प प्रलंबित आहेत. शिवाय त्याच्याकडे यासाठी वेळही नाही. त्यातच ‘टायगर 3’ चे 45 टक्के शूटिंग झाले आहे. ते पूर्ण करण्यातच हे वर्षे संपून जाईल. सलमानने ऑक्टोबरपर्यंतच्या तारखा ‘टायगर 3’साठी दिल्या आहेत. त्यानंतर सलमान साजिद नाडियाडवालाच्या बॅनरचा ‘कभी ईद कभी दीवाली’ किंवा मुराद खेतानीचा दुसरा चित्रपट करू शकतो.

  • आग्रा ते चंबलपर्यंत शोधले शोसाठी लोकेशन

'92 डेज’ हा चित्रपट एका प्रवासावर आधारित कथा आहे. याची सुरुवात आग्रापासून होते. त्यानंतर मथुरा, मुरैना, ग्वालेहर, चंबळ, ओरछा, इंदुरवरुन महेश्वरला प्रवाास करते. या भागात टीम 92 दिवस शूटिंग करणार आहे. या सिरीजसाठी निर्माते 30 एप्रिलला पुन्हा जागेचा शोध घेणार आहेत. मात्र सध्या तर सर्वांच्या नजरा 3 मेवर खिळल्या आहेत. या दिवशी शूटिंग होईल किंवा लॉकडाऊन पुढे वाढेल ठरणार आहे.

  • मुख्य भूमिकेत दिसणार मेहुणा आयुष शर्मा

सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, 'या शोमध्ये सलमानचा मेहुणा आयुष शर्मा दिसणार आहे. तीन दिग्दर्शक मिळून याचे दिग्दर्शन करणार आहेत. झी स्टुडिओशी सलमानचे चांगले संबंध असले तरी, '92 डेज ‘ही सिरीज सलमान झी स्टुडिओऐवजी प्राइम व्हिडिओंसाठी बनवणार आहे.'

बातम्या आणखी आहेत...