आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी सामान्यांसारखे जाऊ शकत नाही. सेलिब्रिटी एखाद्या ठिकाणी पोहोचले की त्यांच्या चाहत्यांचा गर्दी तिथे गोळा होत असते. म्हणूनच सेलिब्रिटींच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्या अंगरक्षकांच्या खांद्यावर असते, जे सावलीसारखे त्यांचे संरक्षण करतात. हे अंगरक्षक गर्दीच्या ठिकाणांपासून ते कोणत्याही कार्यक्रमात सेलिब्रिटींसोबत राहतात, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी बॉडीगार्ड्सना मोठे मानधन दिले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या सेलिब्रिटीच्या बॉडीगार्डला किती पगार दिला जातो...
सलमान खान
शेरा असे सलमानच्या अंगरक्षकाचे नाव आहे. शेरा गेल्या 24 वर्षांपासून सलमानला संरक्षण देत आहे. सलमानला जिथे पोहोचायचे असते, शेरा एक दिवस आधी त्या ठिकाणाचा आढावा घेतो. कधी कधी मार्ग मोकळा करण्यासाठी त्याला पाच-पाच किलोमीटर पायी चालावे लागते. बॉडी बिल्डिंगमध्ये ज्युनिअर मि. मुंबई आणि ज्युनियर मिस्टर महाराष्ट्र सारखे विजेतेपद पटकावणारा शेरा नेहमीच सलमानसोबत सावलीसारखा असतो. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, सलमानच्या संरक्षणासाठी शेराला वार्षिक 2 कोटी रुपये म्हणजेच सुमारे 16.50 लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो.
शाहरुख खान
रवी सिंग असे शाहरुखच्या अंगरक्षकाचे नाव असून तो अनेक वर्षांपासून त्याचे संरक्षण करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला सुमारे 2.7 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो. त्यानुसार त्याचा मासिक पगार 22.50 लाख रुपये आहे.
अक्षय कुमार
अक्षय कुमारच्या अंगरक्षकाचे नाव श्रेयस आहे. अक्षयसोबतच तो त्याचा मुलगा आरवचीही सुरक्षा करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासाठी अक्षय त्याच्या अंगरक्षकाला वार्षिक 1.2 कोटी म्हणजेच 10 लाख रुपये प्रति महिना पगार देतो.
आमिर खान
आमिर खानच्या बॉडीगार्डचे नाव आहे युवराज घोरपडे आहे. त्याला बॉडीबिल्डिंगमध्ये करिअर करायचे होते पण ते होऊ शकले नाही. यानंतर तो अशा सिक्युरिटी एजन्सीत जॉईन झाला जिथे त्याला आमिर खानच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराजला वार्षिक 2 कोटी रुपये म्हणजेच सुमारे 16.6 लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो.
अनुष्का शर्मा-विराट कोहली
अनुष्का आणि विराट त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रकाश सिंग उर्फ सोनू यांच्याकडे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनूचे वार्षिक सॅलरी पॅकेज 1.2 कोटी रुपये आहे, म्हणजेच यानुसार त्याला दरमहा सुमारे 10 लाख रुपये मिळतात.
दीपिका पदुकोण
दीपिकाच्या बॉडीगार्डचे नाव जलाल असून तो अनेक वर्षांपासून तिला सुरक्षा पुरवतोय. दीपिका त्याच्याशी केवळ सपोर्ट स्टाफप्रमाणेच वागते असे नाही तर त्याला राखीही बांधते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जलालला वार्षिक 80 लाख ते 1.2 कोटी रुपये पगार मिळतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.