आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पठाण' शूटिंग अपडेट:'पठाण'मध्ये शाहरुखसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार सलमान खान, दुबईत 15 दिवसांचे असेल शूटिंग शेड्यूल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान ‘पठाण’ चित्रपटाचे 15 दिवसांचे वेळापत्रक पूर्ण करेल.

अभिनेता शाहरुख खान दोन वर्षांच्या ब्रेकनंतर आगामी पठाण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या या चित्रपटाचे दुबईत चित्रीकरण सुरु आहे. आता या चित्रपटाविषयीची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान शाहरुखसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार असून तो लवकरच दुबईत शाहरुखसोबत चित्रीकरण सुरु करणार आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'अंतिम: द फायनल ट्रूथ' या चित्रपटाचे शूटिंग सलमान खानने नुकतेच पूर्ण केले आहे. बातमीनुसार, तो आता दुबईला जाऊन शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' च्या शूटिंगमध्ये सामील होणार आहे. मार्चमध्ये ‘टायगर 3’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी सलमान ‘पठाण’ चित्रपटाचे 15 दिवसांचे वेळापत्रक पूर्ण करेल, असे सांगितले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, 'पठाण'मध्ये सलमान टायगरच्या भूमिकेत दिसणार असून त्याला चित्रपटाचे मानधन आधीच दिले गेले आहे. पुन्हा एकदा शाहरुख आणि सलमानला मोठ्या पडद्यावर एकत्र बघायला चाहते नक्कीच उत्सुक आहेत.

पहिल्यांदाच बुर्ज खलिफामध्ये होणार बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग
पठाण या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या बुर्ज खलिफामध्ये होणार आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये बुर्ज खलिफा बाहेर दाखवण्यात आला आहे. मात्र पहिल्यांदाच या इमारतीच्या आतमध्ये एका भारतीय चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल. शाहरुखने दुबईतील चित्रीकरण सुरु केले असून तेथील व्हिडिओदेखील सोशल मीडियावर समोर आले आहेत.

विशेष म्हणजे आतापर्यंत हॉलिवूडमध्येही केवळ दोनच चित्रपटांचे चित्रीकरण बुर्ज खलिफाच्या आत झाले आहे. या दोन चित्रपटांमध्ये टॉम क्रूजच्या 'मिशन इम्पॉसिबल : घोस्ट प्रोटोकॉल' आणि विन डीजल, ड्वेन जॉनसन आणि पॉल वॉकर स्टारर 'फास्ट अँड फ्युरियस 7' यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...