आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राची कौतुकाची थाप:'आर्या' वेब सीरिज बघून सलमान सुश्मिताला म्हणाला दबंग, उत्तर देताना सुश्मिता म्हणाली - हाय मेरा बच्चा...

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुश्मितानेदेखील सलमानचे अनोख्या पद्धतीने आभार व्यक्त केले आहेत.

अभिनेत्री सुश्मिता सेन हिने डिस्ने प्लस हॉटस्टारच्या आर्या या वेब सीरिजद्वारे कमबॅक केले आहे. यात तिने हाऊसवाईफ ते डॉन बनलेल्या महिलेची व्यक्तिरेखा साकारली असून तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. चाहत्यांसोबतच अभिनेता सलमान खानने या वेब सीरिजमधील संवादांचे कौतुक केले आहे. सुश्मितानेदेखील सलमानचे अनोख्या पद्धतीने आभार व्यक्त केले आहेत.

सलमान खानने आपल्या ट्विटर हँडल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला चाहत्यांना ही वेब सीरिज बघण्याचे आवाहन केले आहे. सलमानच्या या व्हिडिओत  सुश्मिताच्या संवादांची एक झलक दाखवली गेली आहे. सीरिजचा एक संवाद ऐकून सलमान म्हणतो, याला म्हणतात दबंग.. सुश्मिताचा कमबॅकचा निर्णय अगदी योग्य ठरु शकतो. आर्या ही वेब सीरिज बघण्यासाठी माझ्याजवळ देखील एक डायलॉग आहे, एकदा मी पहिला एपिसोड बघितला तर त्यानंतर मी एकही एपिसोड मिस करत नाही, अशा शब्दांत सलमानने सुश्मिताची प्रशंसा केली आहे.

आपल्या मित्राकडून मिळालेली कौतुकाची थाप बघून सुश्मिता आनंदी आहे. तिनेही अनोख्या पद्धतीने सलमानचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, सर्वप्रथम मी माझा आवडता संवाद जोडू इच्छिते आणि तो म्हणजे -  हाय मेरा बच्चा... सलमान तुझ्या प्रेम आणि कौतुकासाठी मी आभारी आहे. हे आमची टीम आर्यासाठी एक जग आहे. आय लव्ह यू, अशा शब्दांत सुश्मिताने सलमानचे आभार मानले आहेत.

सलमान आणि सुश्मिता खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी सिर्फ तूम, बीवी नं. 1, तुमको ना भूल पाएंगे, मैंने प्यार क्यों किया या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सुश्मिताने दीर्घ काळानंतर आर्या या वेब सीरिजच्या माध्यमातून कमबॅक केले आहे. ही वेब सीरिज 19 जूनपासून सुरु झाली असून यात तिच्यासह चंद्रचूर सिंह, सिकंदर खेर, नमिता भाटिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...