आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाला हरवायचं आहे!:'राधे'च्या रिलीजच्या दुस-या दिवशी सलमान खानने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानने 24 मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.

55 वर्षीय अभिनेता सलमान खानने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. शुक्रवारी सलमानसह त्याचा धाकटा भाऊ सोहेल देखील लस घेण्यासाठी पोहोचला होता. तत्पूर्वी, सलमानने 24 मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. आणि ही माहिती सलमानने स्वतः सोशल मीडियावरही शेअर केली होती. सलमान याकाळात कोरोना पीडित कुटुंबियांनाही मदत करत आहे.

कुटुंबाचे झाले लसीकरण
सलमान आणि सोहेल यांच्या व्यतिरिक्त त्यांचे वडील सलीम, आई सलमा आणि हेलन आणि भाऊ अरबाज खान यांनीही लस घेतली आहे. अलीकडेच सलमानने सांगितले होते की, त्याची धाकटी बहीण अर्पिताला कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ती यातून पुर्णपणे बरी झाली आहे. शुक्रवारी अर्पिता आपल्या दोन्ही मुलांसह सलमानच्या घरी ईदच्या सेलिब्रेशनसाठी आली होती.

बातम्या आणखी आहेत...