आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव 2021:यंदा सलमान खान कुटुंबासह गणेशोत्सवाच्या जल्लोषात सहभागी होऊ शकणार नाही, 'टायगर 3'चे शूटिंग शेड्यूल आहे यामागचे कारण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या ऑस्ट्रियामध्ये 'टायगर 3'चे शूटिंग करत आहे सलमान

गणेशोत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी गणेशोत्सवाला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपापल्या घरी गणपतीचे विशेष पद्धतीने स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे. सलमान खान दरवर्षी गणेश चतुर्थीचा सण आपल्या कुटुंबासह थाटात साजरा करतो. पण यावेळी 'टायगर 3' च्या या चित्रपटाच्या शूटिंग शेड्युलमुळे तो आपल्या कुटुंबासह गणपती उत्सवात उपस्थित राहू शकणार नाहीये.

सध्या ऑस्ट्रियामध्ये 'टायगर 3'चे शूटिंग करत आहे सलमान
सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटाचे शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रियामध्ये आहे. यामुळे तो यावर्षी आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवाला उपस्थित राहू शकणार नाही. मात्र सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिताच्या घरी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सलमान खानचे कुटुंब दीड दिवस घरात गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत. पण, सलमान ऑस्ट्रियात बायो बबलमध्ये 'टायगर 3' चे शूटिंग करत असल्याने तो या पूजेत सहभागी होऊ शकणार नाही.

'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीतील तिसरा चित्रपट आहे
'टायगर 3' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक था टायगर'चा तिसरा भाग आहे. ऑस्ट्रियापूर्वी रशिया आणि टर्कीमध्ये चित्रपटाचे शूटिंग झाले. मागील दोन चित्रपटांप्रमाणे सलमान खान यातदेखील रॉ एजंट टायगरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमधील पहिला चित्रपट 'एक था टाइगर'चे दिग्दर्शन कबीर खानने केले होते तर दुसरा चित्रपट 'टाइगर जिंदा है' दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते. आता 'टायगर 3'चे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत.

या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांच्यासह अभिनेता इम्रान हाश्मी याचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटासाठी सलमान, कतरिना आणि इम्रान अनेक महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. इम्रानचा चित्रपटातील एंट्री सीन धमाकेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा चित्रपट बॉलिवूडच्या महागड्या अॅक्शन चित्रपटांपैकी एक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...