आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक 'अंतिम'ची पहिली झलक:'अंतिम: द फाइनल ट्रुथ'चा फर्स्ट लूक टीझर रिलीज, आयुष शर्मासोबत फायटिंग करताना दिसला सलमान

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटिंग सीनने होते.

अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर रिलीज झाला आहे. सलमानचा मेहुणा आणि को-स्टार आयुष शर्माने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. यात सलमान आणि आयुष हे दोघेही शर्टलेस दिसत आहेत. टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटिंग सीनने होते.

या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली असून दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट मुळशी पॅटर्न या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सलमान पोलिस अधिका-याच्या भूमिकेत असून आयुषने गँगस्टरची भूमिका वठवली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

वृत्तानुसार, 16 नोव्हेंबरपासून पुण्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत आयुष शर्माने याचे चित्रीकरण केले होते. तर सलमान खान अलीकडेच या चित्रपटाच्या चित्रीकरणावर रुजू झाला आहे.

सलमान अखेरचा 'दबंग 3' मध्ये दिसला होता
सलमान खान अखेरचा 20 डिसेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या 'दबंग 3' चित्रपटात दिसला होता. 2020 मध्ये ईदच्या निमित्ताने त्याचा 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु कोरोना व लॉकडाउनमुळे चित्रीकरण लांबणीवर पडले होते. हा चित्रपट आता 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'राधे' आणि 'अंतिम' व्यतिरिक्त सलमान 2021 मध्ये 'पठाण' आणि 'लालसिंग चड्ढा' मध्येही कॅमिओ करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...