आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा:'किसी का भाई किसी की जान' हे आहे नाव; व्हिडिओमध्ये दिसला डॅशिंग लूक

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानने एक टिझर व्हिडिओ शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली आहे. 'किसी का भाई किसी की जान' असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सलमान नवीन लूकमध्ये दिसतोय. लांब केसातील त्याचा डॅशिंग लूक लक्ष वेधून घेतोय. चाहत्यांनादेखील सलमानचा हा लूक पसंत पडला असून ते या व्हिडिओवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.

कसा आहे टिझर
चित्रपटाच्या टिझरच्या सुरुवातीला सलमान लडाखमध्ये बाइक चालवताना दिसतोय. त्यानंतर तो पायी पहाडांवर चालताना दिसतोय. ब्राउन कलरचा टीशर्ट आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये सलमानचा स्वॅग बघण्यासारखा आहे. याशिवाय त्याने केस आणि दाढी वाढवलेली दिसतेय. सनग्लासेसने त्याने हा लूक पूर्ण केला आहे. नेहमीपेक्षा सलमानचा हा लूक खूप वेगळा दिसतोय.

कोण कोण आहेत या चित्रपटात
सलमान व्यतिरिक्त पूजा हेगडे, राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद शामजी यांनी केले आहे. यापूर्वी सलमानने 26 ऑगस्ट रोजीसुद्धा त्याचा हा लूक शेअर केला होता.

सिनेसृष्टीत 34 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेअर केला होता लूक

सलमान खानला इंडस्ट्रीत नुकतीच 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सलमानने 26 ऑगस्ट रोजी देखील त्याचा हा लूक शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करत सलमान म्हणाला होता, '34 वर्षांपूर्वी होता आणि आता 34 वर्षांनंतर आता आहे, माझ्या आयुष्याचा प्रवास कोठूनही सुरू झाला असला तरी, 2 शब्दांचा बनला आहे. तेव्हा आणि आता माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद 'किसी का भाई किसी की जान'... असे सलमान म्हणाला होता.

बातम्या आणखी आहेत...