आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सलमानच्या शेतीची चर्चा:बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्रच्या पावलावर सलमान खानचे पाऊल, मागील 4 पोस्टवरुन दिसून आली ही गोष्ट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या सलमान शेतीत मन रमवतोय.

अभिनेता सलमान खान मागील मार्च महिन्यापासून त्याच्या पनवेलस्थित फार्महाऊसवर आहे. येथे तो काही कामानिमित्त गेला होता आणि त्यानंतर लॉकडाऊन घोषित झाला होता, त्यामुळे तो त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांसह तेथेच थांबला. अद्याप तो मुंबईत परतलेला नाही. आता पावसाळा सुरु झाला असून सलमान आपल्या फार्महाऊसवर शेती करण्यात रमलेला दिसतोय. त्याने शेती करतानाची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. मागील पोस्टमध्ये तो शेतात भात लावणी करताना दिसला होता. त्यामुळे सलमान सध्या बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे म्हटले जात आहे.

धर्मेंद्रदेखील त्यांच्या फार्महाऊसवर शेती करतात. ते आपल्या फार्महाऊसचे व्हिडिओ सोशल मीडियावर कायम शेअर करत असतात. 

View this post on Instagram

Rice plantation done . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Jul 20, 2020 at 9:59am PDT

1) ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसला होता 

View this post on Instagram

Farminggg

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Jul 19, 2020 at 11:32am PDT

दोन दिवसांपूर्वी सलमानने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करताना दिसला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने एकच शब्द लिहिला होता - शेती. या पोस्टमध्ये सलमान शेतीत रमलेला दिसला. त्याच्या व्हिडिओवर कमेंट करताना प्रीती झिंटाने लिहिले आहे - हे पाहिल्यावर मला मन्नतां गाण्याची आठवण झाली.

2) चिखलाने माखलेला दिसला 

View this post on Instagram

Respect to all the farmers . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Jul 14, 2020 at 3:42am PDT

सलमानने 6 दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याचे संपूर्ण शरीर चिखलाने माखलेले दिसले होते. या पोस्टसह कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होतो - सर्व शेतक-यांना सलाम. मात्र सलमानच्याया फोटोला नेटक-यांनी चांगलेच ट्रोल केले होते. ट्रोलर्सनी लिहिले होते - शेतात काम करत असताना अंगाला एवढा चिखल लागत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे.

3) जय जवान जय किसानचा दिला नारा 

सलमानने शेतात भात लावणी करतानाचा एक फोटो शेअर केला होता.  हा पोस्ट शेअर करुन त्याने जय जवान जय किसान असे लिहिले होते. मात्र सलमानला या फोटोवरुनही ट्रोल केले गेले होते.