आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवेज काझीसोबत खास बातचीत:‘टायगर 3’ नंतर सलमान दिवाळीपासून सुरू करणार होता ‘कभी ईद कभी दीवाली’चे शूटिंग, यंदाही होताना दिसत नाही शूटिंग

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान त्याचा बॉडी डबल परवेज काझीसोबत ​​​​​​​ - Divya Marathi
सलमान त्याचा बॉडी डबल परवेज काझीसोबत ​​​​​​​
  • विदेशात होणार होते ‘टायगर 3’चे शूटिंग

सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ नुकताच प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वीपर्यंत तो मुंबईत यशराजच्या ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. या चित्रपटानंतर तो दिवाळीपासून साजिद नाडियादवालाच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘कभी ईद कभी दीवाली’चे शूटिंग सुरू करणार हाेता. दिव्य मराठीशी चर्चा करताना त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले, कोरोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती उद्वभवली नसती तर ‘कभी ईद कभी दीवाली’ याचे शूटिंग गेल्या वर्षीच दिवाळीपासून सुरू केले असते. यावर्षीदेखील दिवाळीपासून याचे शूटिंग सुरू होऊ शकेल की नाही यावर सशंय कायम आहे. कारण अजून 'टायगर 3’चे काम संपले नाही.

  • विदेशात होणार होते ‘टायगर 3’चे शूटिंग

सलमानसोबत गेल्या 8 वर्षांपासून बॉडी डबलचे काम करत असलेला परवेज काझी म्हणाला, ‘टायगर 3’चे शूटिंग पूर्णपणे परदेशात होाणर होते मात्र कोरोनामुळे ते मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये शूट केले गेले. यशराज स्टुडिओच्या व्यतिरिक्त जोगेश्वरीमध्येही चित्रपटाचा सेट बनून तयार आहे. जोगेश्वरीमध्ये आऊटडोर शूटिंग होणार होते, मात्र पावसामुळे आता हे कामदेखील पुढे ढकलू शकते. याशिवाय लंडनमध्ये लॉकडाउन उघडले आहे तर तेथे एखाद्या चांगल्या ठिकाणाची रेकी केली जाऊ शकते. मात्र याविषयी अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आली

  • सलमान स्वत: करतो स्टंट

परवेजने सांगितले, सलमान त्याला कधीच रिस्की सीन करुन देत नाही. अशा प्रकारचे सीन तो स्वत:च करत असतो. ‘प्रेम रतन धन पायो’ पासून ते ‘राधे’मधील हेलीकॉप्टर फाइट सीन सलमानने स्वत: शूट केले होते. माझ्याकडुन तो कधी-कधी किंवा गरज पडल्यास करुन घेतो. यासाठी तो मला लाख रुपये पगार देतो, कारण मला त्याच्यासोबत सेटवर दिवसभर राहावे लागते.

  • क्रू मेंबर्सना जास्त मानधन मिळावे म्हणून ठेवतो लांब शूटिंग शेड्यूल

एकीकडे अक्षय कुमार आपल्या चित्रपटाचे शूटिंग लवकर पूर्ण करतो तर दुसरीकडे सलमान आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगचे वेळापत्रक लांबलचक ठेवतो. याविषयी परवेज सांगतो, 'सलमानच्या चित्रपटावर अनेक लोकांची रोजीरोटी चालते. त्यामुळे तो आपल्या चित्रपटाचे शेड्यूल 70 ते 100 दिवसांचे ठेवतो. जेणेकरुन डेली वेजेस वर्कर्सना जास्त पैसे मिळू शकतील.'

बातम्या आणखी आहेत...