आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी:अनीस बज्मींच्या आगामी कॉमेडी चित्रपटात 15 व्यांदा प्रेम बनणार सलमान खान, 2022 पासून शूटिंग होईल सुरू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाचे शूटिंग 2022 पासून सुरू होणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो लवकरच 15 व्यांदा मोठ्या पडद्यावर त्याचे आयकॉनिक प्रेम नावाचे पात्र साकारताना दिसेल. दिग्दर्शक अनीस बज्मींच्या आगामी कॉमेडी चित्रपटात सलमान खान झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2022 पासून सुरू होणार आहे.

नुकत्याच आलेल्या पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अंदाज अपना अपना, बीवी नंबर 1, जुडवा, मुझसे शादी करोगी, नो एंट्री, मैंने प्यार क्यों किया, पार्टनर आणि रेडी नंतर सलमान लवकरच कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. सलमान बराच काळापासून चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होता जो शोध आता पूर्ण झाला आहे. सलमान गेल्या काही महिन्यांपासून अनीस बज्मी आणि इतर स्टेकहोल्डर्सशी चर्चा करत आहे.

सलमान खानने यापूर्वी अनीस बज्मी दिग्दर्शित रेडी आणि नो एंट्री सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिपोर्टनुसार, सलमान खान या आगामी कॉमेडी चित्रपटातही प्रेमची भूमिका साकारणार आहे. टायगर 3 चे शूटिंग पुर्ण केल्यानंतर सलमान खान या चित्रपटाचे पेपरवर्क पूर्ण करेल. तोपर्यंत चित्रपटाची स्क्रिप्टही पूर्ण होईल, आणि कलाकार त्यानंतरच अंतिम निर्णय घेतील.

तत्पूर्वी सलमान खान टायगर 3, कभी ईद कभी दिवाली आणि अंतिम या चित्रपटांत दिसणार आहे. सध्या तो कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...