आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार्महाऊसवर पार्टी होणार नाही:सलमान खान यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाही, नवीन वर्षात ‘अंतिम’चे चित्रीकरण करणार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाढदिवशी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सलमान शूटिंग करणार

सलमान खान येत्या 27 डिसेंबरला 55 वर्षांचा होणार आहे. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, सलमान यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीये. या रिपोर्टमध्ये सलमानच्या जवळच्या मित्राचा हवाला देताना म्हटले आहे की, "हे पहिल्यांदा घडणार आहे, जेव्हा आम्ही भाईचा वाढदिवस आणि नवीन वर्षांच्या निमित्ताने फार्महाऊसवर नसू."

वाढदिवशी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सलमान शूटिंग करणार
सलमानच्या जवळच्या मित्राने स्पॉटबॉय सांगितले, "मी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वाचले की यावर्षी सलमान छोटेसे सेलिब्रेशन करणार आहे. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सलमान वाढदिवशी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मेहुण्या (आयुष शर्मा) सोबत 'अंतिम : द फायनल ट्रुथ' चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर असल्याने सेटवर भाईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन होणार हे नक्की."

महेश मांजरेकर सलमानच्या खास मित्रांपैकी एक
महेश मांजरेकर फक्त सलमान आणि आयुष स्टारर 'अंतिम'या चित्रपटाचे दिग्दर्शकच नाहीत तर ते सलमानचे जवळचे मित्रदेखील आहेत. सलमानने महेश यांची मुलगी सई मांजरेकर हिला आपल्या 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. याशिवाय 'अंतिम' या चित्रपटातदेखील सई एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे, असे वृत्त होते. मात्र, खुद्द महेश मांजरेकर यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

सलमान अखेरचा 'दबंग 3'मध्ये दिसला होता

सलमान खान अखेरचा 20 डिसेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या 'दबंग 3' चित्रपटात दिसला होता. 2020 मध्ये ईदच्या निमित्ताने त्याचा 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट येणार होता. परंतु कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले नाही. आता हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'राधे' आणि 'अंतिम' व्यतिरिक्त सलमान 2021 मध्ये 'पठाण' आणि 'लाल सिंग चड्ढा'मध्येही कॅमिओ करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...