आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2020 हे वर्ष चित्रपट जगतासाठी काही विशेष ठरले नाही, परंतु 2021 कडून अनेक अपेक्षा आहेत. येत्या वर्षात सर्व काही चांगले होईल अशी कलाकारांना आशा आहे. दरम्यान, सलमान खान आणि आमिरच्या चाहत्यांसाठीही एक चांगली बातमी आहे. दोघे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात सलमान कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमानचे हे पात्र 90 च्या दशकातील सुपरहिट 'मैने प्यार किया' या चित्रपटातील प्रेमचे असेल. या चित्रपटाच्या यशानंतर सलमानने अनेक चित्रपटात प्रेम नावाची व्यक्तिरेखा साकरली होती.
31 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता मैंने प्यार किया
'मैंने प्यार किया' या चित्रपटाची शूटिंग ऊटी येथे झाली होती आणि 'लाल सिंह चड्ढा'तील सलमानच्या भूमिकेसाठी ऊटीचा सेट मुंबईत तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचा सेटही 1989 च्या काळानुसार तयार करण्यात आला आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटातील सीननुसार, सलमान 'मैंने प्यार किया' मधील 'दिल दीवाना' या गाण्याचे शूट करताना दिसणार आहे. या दृश्यासाठी डिझायनर एश्ले रेबोलो यांनी तेच प्रसिद्ध ब्लॅक जॅकेट डिझाइन केले आहे, जे सलमानने या चित्रपटात घातले होते.
या सीनमध्ये आमिरची व्यक्तिरेखा म्हणजे 20 वर्षीय सैन्यातील जवानची असून त्याला सलमानला शूटिंग करताना बघायचे आणि त्याला भेटायचे असते. या पात्रासाठी आमिर कित्येक आठवडे क्लीन-शेवमध्ये होता.
जानेवारीत या सीनचे चित्रीकरण होणार आहे
आमिर आणि सलमान सुट्टीवर परत आल्यानंतर या सीनचे वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये 8 जानेवारी रोजी शूट केले जाईल. 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवू़ड पटाचा हिंदी रिमेक आहे. फॉरेस्ट गम्पची भूमिका टॉक हँक्सने साकारली होती. 'लाल सिंह चड्ढा'च्या कथेनुसार ही व्यक्तिरेखा 30 वर्षात देशातील सुमारे 100 शहरांमध्ये फिरते आणि सोबतच सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि इतर क्षेत्रातही महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करते.
सलमानला 1989 चा लुक देण्यासाठी व्हीएफएक्सची मदत घेतली जाणार आहे. कारण सध्या सलमानने आपल्या आगामी अंतिम या चित्रपटातील भूमिकेसाठी दाढी वाढवली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.