आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Salman Khan With His Rumoured Girlfriend Iulia Vantur And Other Family Members Were Spotted Sohail Khan’s Residence On Sunday Evening For Ganesh Visarjan

खान कुटुंबातील गणेशोत्सव:भाऊ सोहेल खानच्या घरी गणेश विसर्जनाला पोहोचला सलमान,  युलिया, जॅकलिन आणि डेझी शाह यांनीही दिला बाप्पाला निरोप

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदादेखील खान कुटुंबात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला.

रविवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. अभिनेता सलमान खानच्या घरीदेखील दरवर्षी बाप्पा दीड दिवस पाहुणचाराला येत असतो. यंदादेखील खान कुटुंबात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. सलमानचा भाऊ सोहेल खानच्या घरी गणराया विराजमान झाले होते. रविवारी संध्याकाळी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सलमान खानसह यूलिया वंतूर, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस यांनीही हजेरी लावली होती.

थिरकला सलमान खान

यावेळी सलमान त्याचा भाचा आहिलसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसला. सलमानने आहिलला कडेवर घेऊन तालदेखील धरला होता. यावेळी सोहेल आणि अर्पिताच्या घरी विराजमान झालेल्या श्रींचे विसर्जन करण्यात आले. हेलन, अलविरा अग्निहोत्री, अतुल अग्निहोत्री, सलमा खान हेदेखील दिसले.

आयुषच्या घरी आरती झाली

गणपती स्थापनेच्या दिवशी अर्पिताच्या घरी झालेल्या आरतीत सलमान आपल्या कुटुंबासह सहभागी झाला होता. त्याचा श्रींची आरती करतानाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

0