आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानला मिळणार Y+ सुरक्षा:लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या, अक्षय-अनुपम खेर यांनाही X सुरक्षा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडून Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे. सलमानला बऱ्याच दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप असलेल्या टोळीकडून त्याला धमक्या येत आहेत.

अक्षय-अनुपम यांना X सिक्युरिटी मिळाली
सलमानसोबतच महाराष्ट्र सरकारने अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या सुरक्षेतही वाढ केली आहे. त्यांना एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

Y+ सुरक्षा म्हणजे काय?

या सुरक्षा श्रेणीमध्ये एकूण 11 लोक असतात, त्यापैकी 2 कमांडो आणि 2 पीएसओ असतात आणि उर्वरित पोलिस असतात. म्हणजेच आता सलमानसोबत 11 जवान त्याच्या सुरक्षेसाठी सदैव त्याच्यासोबत राहणार आहेत.

लॉरेन्स टोळीने तीन महिन्यांत दोनदा सलमानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पनवेलच्या फार्महाऊसवरही शूटर्स दीड महिना नजर ठेवून होते.
लॉरेन्स टोळीने तीन महिन्यांत दोनदा सलमानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पनवेलच्या फार्महाऊसवरही शूटर्स दीड महिना नजर ठेवून होते.

सलमानच्या वडिलांना मिळाले होते धमकीचे पत्र
सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 'सलीम, सलमान लवकरच तुमचा मूसेवाला करु' असे या पत्रात लिहिले होते. यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधून वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे प्रकरण 3 महिन्यांपूर्वीचे आहे.

सलमानच्या वकिलालाही धमकी मिळाली होती
सलमानला धमकी दिल्यानंतर त्याचे वकील हस्तीमल सारस्वत यांनाही लॉरेन्स टोळीकडून धमकी देण्यात आली होती. 'शत्रूचा मित्र हा शत्रू असतो,' अशी धमकी पत्रात देण्यात आली होती. 'आम्ही कोणालाही सोडणार नाही. आपल्या कुटुंबालाही नाही. लवकरच तुमची सिद्धू मुसेवालासारखीच अवस्था होईल,' अशी धमकी पत्रातून देण्यात आली होती.

सलमानला मारण्यासाठी लॉरेन्सने 4 वेळा योजना आखली होती

सलमानला मारण्यासाठी लॉरेन्स टोळीने 4 वेळा योजना आखली होती. यासाठी त्यांनी एक रायफलही खरेदी केली होती. लॉरेन्सने 2018 मध्ये सलमानला मारण्यासाठी शूटर संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. संपतकडे पिस्तूल होते. मात्र, सलमान पिस्तुलाच्या रेंजपासून खूप दूर होता. त्यामुळे तो त्याला मारू शकला नाही. यानंतर त्याने लांब पल्ल्याची रायफल खरेदी केली. त्यानंतर संपत सलमानला मारण्यासाठी आला, पण त्याला मारण्याआधीच तो पकडला गेला. यानंतर लॉरेन्सने त्याला आणखी 2 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सलमानला मारण्याची संधी मिळाली नाही.

बातम्या आणखी आहेत...