आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाईजानचे नवे गाणे:व्यंकटेश-रामचरणसोबत सलमानचा लुंगी डान्स, 'किसी का भाई किसी की जान'मधील 'येंतम्मा' साँग रिलीज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा हा नवा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंज करण्यास सज्ज आहे. तत्पूर्वी सलमान या चित्रपटातील एकामागून एक गाणी रिलीज करत आहे. यापूर्वी चित्रपटातील रोमँटिक ट्रॅक 'नैय्यो लगदा', पंजाबी डान्स नंबर 'बिल्ली बिल्ली', 'फॉलिंग इन लव्ह' आणि 'बठुकम्मा' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता चित्रपटातील नवीन गाणे सिनेरसिकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल झाले आहे.

नवीन गाण्यात हिंदी-तेलुगू फ्यूजन

'येंतम्मा' असे बोल असलेले हे नवीन गाणे हिंदी-तेलुगू फ्यूजन आहे. या गाण्यात सलमान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात रामचरण तेजा हा देखील सलमान आणि व्यंकटेशसोबत लुंगीत थिरकला आहे. सोबतच पूजा हेगडेची झलकदेखील गाण्यात दिसतेय. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे गाणे शेअर केले आहे.

पाहा या गाण्याचा व्हिडिओ...

नेटकऱ्यांना पसंत पडले गाणे...

हे गाणे रिलीज होताच अर्ध्या तासात त्याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले आहे. "3 रॉक स्टार, सलमान सर, व्यंकटेश सर आणि राम चरण हे फक्त एक नाव नाही तर जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी ती भावना आहे," अशी प्रतिक्रिया या गाण्यावर एका नेटकऱ्यांनी दिली आहे.

हिंदी-तेलुगूचे फ्युजन असलेल्या आणि जानी मास्टर यांनी कोरिओग्राफ केलेल्या 'येंतम्मा'या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत तर, पायल देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तसेच, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायले असून, रफ्तारने रॅप केले आहे.

21 एप्रिलला प्रदर्शित होतोय चित्रपट

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय.