आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सलमान खानच्या सुपरहिट 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातील बाल कलाकार हर्षाली मल्होत्रा आता 13 वर्षाची झाली आहे. या चित्रपटात हर्षालीने मुन्नी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. हर्षालीने अलीकडेच दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामध्ये तिचा लूक बराच बदललेला दिसतोय.
हे फोटो शेअर करत हर्षालीने इन्स्टाग्रामवर लिहिले की, 'सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आशा आहे की येणार काळ आनंदाचा असेल.'
लाल सलवार सूटमध्ये हर्षाली खूपच सुंदर दिसत आहे. छायाचित्रांमध्ये कधी ती रांगोळी काढताना तर कधी भाऊबीज साजरी करताना दिसतेय.
वयाच्या सातव्या वर्षी केले होते पदार्पण
हर्षालीने 2015 मध्ये आलेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यावेळी हर्षाली 7 वर्षांची होती. हर्षालीला मुन्नीच्या भूमिकेसाठी बेस्ट डेब्यू फीमेलचा अवॉर्ड मिळाला होता.
चाहते झाले हैराण
हर्षालीचा हा अवतार पाहून तिचे चाहते हैराण झाले होते. एका नेटक-याने लिहिले की, 'माझा विश्वास बसत नाही, हर्षाली आता टीनएजर झाली आहे'.
दुस-या नेटक-याने लिहिले, 'मुन्नी आता मोठी झाली आहे'.
8000 मुलांमधून झाली होती निवड
एका मुलाखतीत बजरंगी भाईजानचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी खुलासा केला होता की, हर्षलीला मुन्नीच्या भूमिकेसाठी 8000 मुलांमधून निवडण्यात आले होते. सुरुवातीला तीन मुलींना शॉर्ट लिस्ट करण्यात आले होते. 7-10 दिवसांच्या वर्कशॉपनंतर हर्षाली ही भूमिका साकारणार हे निश्चित झाले.
'बजरंगी भाईजान' व्यतिरिक्त हर्षाली 'कुबूल है' आणि 'लौट आओ तृषा' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.