आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोस्ट वाँटेड भाई'च्या करिअरवर प्रश्न:ट्रेड एक्सपर्ट म्हणाले- सलमान खानचे हीरो म्हणून करिअर संपले आहे, आता त्याने अमिताभ बच्चनप्रमाणे सपोर्टिंग रोल करायला हवे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमोद मेहरा यांनी सलमान खानच्या काम करण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सलमान खानचा नवीन चित्रपट 'राधे: योअर मोस्ट वाँटेड भाई' 13 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर झी 5 आणि डीटीएचवर पर पे व्ह्यू सेवेअंतर्गत प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यूज मिळाले आहेत, तर दुसरीकडे प्रेक्षकांनासुद्धा चित्रपट फारसे आवडला नाहीये. याविषयी सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्स तयार होत आहेत. ट्रेड एक्सपर्ट आमोद मेहरा यांच्या मते, नायक म्हणून सलमानची कारकीर्द संपुष्टात आली आहे. आता त्याने अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सहाय्यक भूमिका साकारण्यास सुरुवात केली पाहिजे.

सलमानच्या अवतीभोवती सतत त्याची हांजी हांजी करणारे : आमोद मेहरा
रेडिफशी बोलताना ट्रेड एक्सपर्ट आमोद मेहरा म्हणाले, 'चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक गोष्टीत सलमान खानचा हस्तक्षेप असतो. चित्रपटात कोणत्या डान्स स्टेप्स असाव्यात हे तो ठरवतो. चित्रपटात कोणते संगीत असावे, हा देखील त्याचाच निर्णय अशतो. तो दिग्दर्शनातदेखील हस्तक्षेप करतो. एकुणच तो स्वत:ला खूप मोठा समजतो. चित्रपटातील प्रत्येक गोष्ट तोच ठरवतो. सलमानच्या अवतीभोवती सतत त्याची हांजी हांजी करणारी माणसं, कुटुंबीय आणि मित्रमंडळी असते. पण प्रत्यक्षात त्याचा कोणताही खरा मित्र नाही, जो त्याच्या चित्रपटात काय बरोबर आणि काय चूक आहे हे त्याला सांगू शकेल," असे मेहरा म्हणाले.

अमिताभ बच्चन यांच्या उदाहरणावरुन स्पष्टीकरण दिले
मेहरा म्हणाले, "अमिताभ बच्चन यांनी जेव्हा दलेर मेहंदी सोबत मृत्यूदाता या चित्रपटातील 'ऐश करोगे' या गाण्यावर डान्स केला होता, तेव्हा त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली होती. त्यांच्या चेह-यावर वाढत्या वयाचा परिणाम स्पष्ट दिसत होता आणि ते एखाद्या तरुणासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करत होते. याचा परिणाम म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. यानंतर एकामागून एक त्यांचे तीन चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यावेळी हीरो म्हणून आपले करिअर संपुष्टात आले आहे, याची जाणीव त्यांना झाली. आणि ते यश चोप्रांकडे गेले. एक अभिनेता म्हणून त्यांनी मोहब्बतें मधून स्वतःला रिइन्वेंट केले."

सलमानने स्वतःला नव्याने बदलायला हवे
सलमान खानच्या करिअरद्दल मेहरा म्हणाले, "मी असं म्हणत नाही की सलमानची कारकीर्द संपली आहे. मला म्हणायचे आहे की, हीरो म्हणून सलमानची कारकीर्द संपली आहे. त्याने आता सहाय्यक भूमिका निभावल्या पाहिजे. त्यांनी स्वतःला रिइन्वेंट करायला हवे."

भाईच्या 'राधे'ची क्रेझ ओसरली

'राधे' (येथे वाचा सविस्तर)

बातम्या आणखी आहेत...