आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. शूटिंग सुरू झाल्यापासून या चित्रपटात अनेक बदल करण्यात आले आहेत. याआधी आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांना चित्रपटाच्या कास्टिंगमधून वगळण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता 'कभी ईद कभी दिवाली'च्या शीर्षकात बदल करण्यात आला असून आता चित्रपटाचे नाव 'भाईजान' असे करण्यात आले आहे.
सलमान शूटिंगसाठी हैदराबादला रवाना झाला आहे
ETimes च्या रिपोर्टनुसार, 'कभी ईद कभी दिवाली'चे नाव पूर्वीप्रमाणेच 'भाईजान' असे ठेवण्यात आले आहे. खरंतर आता सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे. याआधी सलमानचा मित्र आणि निर्माता साजिद नाडियादवाला या चित्रपटाचा निर्माता होता. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान नुकताच मुंबईहून हैदराबादला रवाना झाला आहे. येथे त्याचे 25 दिवसांचे वेळापत्रक असेल.
क्रिएटिव्ह मतभेदांमुळे आयुष चित्रपटातून बाहेर पडला
या चित्रपटात सलमानचा मेहुणा आयुष आणि झहीर इक्बाल देखील झळकणार होते. पण आता त्याचा मेहुणा म्हणजेच आयुष शर्मा या चित्रपटातून बाहेर पडला आहे. यासोबतच झहीर इक्बालऐवजी दुस-या अभिनेत्याचा शोध सुरु झाला आहे.
'अंतिम द फायनल ट्रुथ' या चित्रपटात आयुष शर्मा आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसले होते. 'कभी ईद कभी दिवाली'मधून हे दोघे दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार होते. पण आता तसे होताना दिसणार नाही. रिपोर्ट्सनुसार, सलमानचा मेहुणा आयुष चित्रपटाच्या टीमसोबतच्या काही क्रिएटिव्ह मतभेदांमुळे या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे. आयुषने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने दिवसभराचे शूटिंगही पूर्ण केले होते.
सिद्धार्थ आणि जस्सी या चित्रपटात झळकण्याची शक्यता
दुसरीकडे, कभी ईद कभी दिवालीचे निर्माते आता झहीर इक्बालच्या रिप्लेसमेंटच्या शोधात आहेत. ETimes च्या रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी आता झहीरच्या भूमिकेसाठी जस्सी गिलशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर आयुषच्या भूमिकेसाठी सिद्धार्थ निगमला अप्रोच करण्यात आले आहे.
हा चित्रपट 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे
'कभी ईद कभी दिवाली'मध्ये सलमान खानशिवाय पूजा हेगडे, राघव जुयाल आणि तेलुगू अभिनेता व्यंकटेश दग्गुबाती दिसणार आहेत. या चित्रपटाचा सेट मुंबईतील विलेपार्ले येथे तयार करण्यात आला असून त्याचा मुहूर्त येथे करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. हा चित्रपट 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट्स
सलमान खानने अलीकडेच आयफा सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. अबू धाबीच्या यास आयलँडवर यंदाचा आयफा सोहळा रंगला. याशिवाय सलमान टायगर सिरिजचा तिसरा चित्रपट 'टायगर-3' वर काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसणार आहे. यासोबतच तो आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' आणि शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.