आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Salman Khan's Manager Lodged A Written Complaint In Cyber Cell, Strict Action Will Be Taken Against Those Who Involved In Piracy Of 'Radhe'

'राधे'च्या पायरसीवर कारवाई:सलमान खानच्या मॅनेजरने सायबर सेलमध्ये दिली लेखी तक्रार, 'राधे'ची पायरसी करणा-यांवर केली जाणार कडक कारवाई

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायरसीमुळे संतापला सलमान खान

सलमान खान स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट 13 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये आणि OTT-DTH यावर 'पे पर व्यू' सेवे अंतर्गत प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच इंटरनेटवरही लीक झाला होता. 'राधे'चे पायरेटेड व्हर्जन बर्‍याच टॉरेंट साइट्स, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम अ‍ॅपवर अपलोड केले गेले. आता अलीकडेच सलमान खानच्या मॅनेजरने मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये ‘राधे’च्या पायरसी विरोधात लेखी तक्रार दिली आहे.

तर एक दिवसाआधीच सलमान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'राधे'ची पायरसी करणा-यांना कडक इशारा दिला होता. सायबर सेल आता त्या ऑनलाइन साइट्सच्या सोर्सचा मागोवा घेत आहे, ज्याद्वारे चित्रपटाची पायरेटेड आवृत्ती बर्‍याच लोकांनी अपलोड आणि डाउनलोड केली आहे. एका अधिका-याने सांगितले की, "ZEE ने सायबर सेलमध्ये लेखी तक्रार दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर व टेलीग्रामसह इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार्‍या 'राधे' चित्रपटाच्या पायरेटेड आवृत्तीशी संबंधित प्रकरणाची चौकशी सायबर सेल करीत आहे."

आमच्याकडे आलेल्या तक्रारीचा तपास सुरू केला आहेः डी.सी.पी.
या प्रकरणात डीसीपी (सायबर) रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या नवीन चित्रपटाच्या पायरीसबद्दल त्यांच्याकडे लेखी तक्रार आली आहे. करंदीकर म्हणाल्या, “आम्ही प्राप्त झालेल्या तक्रारीचा तपास सुरू केला आहे आणि आमची टीम चित्रपटाचे पायरेटेड व्हिडिओ अपलोड केलेल्या साइटच्या सोर्सचा मागोवा घेईल.”

पायरसीमुळे संतापला सलमान खान
यापूर्वी रविवारी सलमान खानने एक पोस्ट शेअर करून पायरसी करणा-यांवर संताप व्यक्त केला होता. तो म्हणाला, “आम्ही आमचा 'राधे’ हा चित्रपट 249 या अतिशय माफक दरात उपलब्ध करुन दिला आहे. असे असूनही, पायरेटेड साइट्स बेकायदेशीरपणे चित्रपट स्ट्रिमिंग करतात, हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. सायबर सेल या सर्व बेकायदेशीर पायरेटेड साइटवर कारवाई करीत आहे. कृपया पायरसीचा भाग होऊ नका, अन्यथा सायबर सेल तुमच्याविरूद्ध देखील कारवाई करेल.''

पहिल्याच दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेकॉर्ड बनवला
राधे हा चित्रपट भारतात ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर ‘पे पर व्ह्यू’ सेवेअंतर्गत हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'राधे'ने डिजिटल रिलीजच्या पहिल्याच दिवशी विक्रम नोंदविला आहे. 'राधे' हा रिलीजच्या दिवशी 4.2 मिलियन व्ह्यूजसह ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर सर्वाधिक बघितला गेलेला चित्रपट ठरला आहे. यासाठी सलमाननेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले होते.

हा चित्रपट प्रदर्शित होताच झी 5 चा सर्व्हर क्रॅश झाला होता
'राधे' हा चित्रपट सिनेमागृहांव्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्म झी-प्लेक्ससह झी 5 वरही प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही तासांतच झी 5 चा सर्व्हर क्रॅश झाला होता. चित्रपटाच्या प्रतीक्षेत असलेल्या यूजर्सनी झी 5 वर मोठ्या प्रमाणात स्ट्रीम करणे सुरु केले. एवढे यूजर्स प्लॅटफॉर्मसाठी हाताळणे कठिण झाले आणि काही काळासाठी सर्व्हर क्रॅश झाला. झी 5 वर हा चित्रपट चालू नसल्यामुळे यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर त्याबद्दल तक्रारी करण्यास सुरवात केली. पण, झी 5 टीमने तत्काळ परिस्थिती सांभाळली आणि सुमारे एक तासानंतर अॅपने पुन्हा कार्य करणे सुरू केले. प्रभू देवा दिग्दर्शित ‘राधे’ चित्रपटात सलमानशिवाय दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा, गोविंद नामदेव आणि गौतम गुलाटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...