आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन ब्रेकिंग:ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट रिलीज होऊ शकतो सलमानचा 'राधे', 250 कोटींची ऑफर मिळाली तर घेऊ शकतो निर्णय

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान खान प्रॉडक्शनचे बिझनेस डील सांभाळणारे जॉर्डी पटेल यांनी ही माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमुळे थिटएर आणि  डिजिटल प्लॅटफॉर्मवर यांच्यात स्पर्धा बघायला मिळणार आहे.  ट्रेड पंडित आणि निर्मात्यांनी सांगितल्यानुसार,  डिजिटल प्लॅटफॉर्मनी  आतापर्यंत बनलेले बहुतेक चित्रपट आणि वेब शोला अॅप्रोच केले आहे. ते 1500 ते 2000 कोटी पर्यंतची गुंतवणूक करण्यास तयार आहेत. अशा परिस्थितीत निर्माते अधिक चांगली डील मिळल्यास संमती दर्शवू शकतात.

आता बातमी आहे की, सलमान खानचा चित्रपट 'राधे' थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास तयार आहे. याविषयी दैनिक भास्करला सलमान खानच्या निकटवर्तीयांकडून  याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मेकर्स वर्षभर थांबू शकत नाहीत

सलमान खान प्रॉडक्शनचे बिझनेस डील सांभाळणारे जॉर्डी पटेल यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'भारतीय निर्माते अशा स्थितीत नाहीत ज्याच्या अंतर्गत ते पुढील एक वर्षासाठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करू शकतात. अनेक डिपार्टमेंटमधील बरेच लोक आर्थिक संकाटत सापडले आहेत. अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा हॉटस्टारवर रिलीज  होऊ शकतो. जर आम्हालाही राधेसाठी संधी मिळाली तर आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो.

लोकांना थिएटरमध्ये जाण्याची वाटेल भीती 

जॉर्डी पटेल म्हणाले, "आमचा चित्रपट अद्याप पूर्ण झाला नाही, म्हणून आम्ही त्याबद्दल विचार करीत नाही." जून-जुलैपर्यंत मुंबईसारख्या ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे वृत्त आहे. जोपर्यंत कोरोना व्हायरसवर लस निघत नाही, तोवर आपल्या  आयुष्यात भीती कायम राहील. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी कोण जाईल? आपल्या शेजारी कोण बसला आहे हे कोणाला माहित आहे? मनातील भीती दूर होणार नाहीये.

250 कोटीची ऑफर मिळाली तर शक्य आहे 

जॉर्डी पटेल म्हणतात की, कलेक्शनच्या बाबतीत मुंबई सर्वात मोठे शहर  आहे. अशा परिस्थितीत जर चित्रपटाचा व्यवसाय 300 कोटींचा असेल तर 150 - 160 कोटी आमच्या हातात येतात. त्यानुसार, ओटीटीची ऑफर बघू. 250 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर आल्यास त्या दृष्टीने विचार करण्यात येईल. चित्रपटाचे बजेटही लक्षात घ्यावे लागेल. आम्ही ओटीटीसाठी तयार आहोत. चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होईल असे काही नाही. चित्रपटगृहे कार्यरत होईपर्यंत आम्ही बसून राहू, असे काहीही नाही.

जॉर्डी म्हणाले की, आम्ही ओटीटीवर येऊ शकतो. एखाद दुसरा चित्रपट तेथे टाकू शकतो. अर्थातच आपला चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावा, अशी सगळ्यांची इच्छा असते. आमच्या चाहत्यांनाही तेच हवे आहे. पण परिस्थिती चांगली नाही आणि जर चित्रपट तयार असेल तर तो डबाबंद ठेवण्यात काही अर्थ नाही.

निर्मात्यांना थिएटर रेव्हेन्यूची भीती 

व्यापार विश्लेषक तरण आदर्श म्हणतात, “हे खरं आहे की ओटीटींनी सर्वांकडे संपर्क साधला आहे. तथापि, अद्याप कोणीही निर्णय घेतलेला नाही, कारण निर्मात्यांना असे वाटते की चित्रपट ओटीटीवर आल्यास त्यांचा थिएटरचा महसूल हातून जाईल. 

भारताच्या संदर्भात आजही थिएटरमधून अधिक कलेक्शन होते. समजा, बजरंगी भाईजानचे एकूण कलेक्शन 300 ते 350 कोटी होते जेव्हा देश-विदेशात रेव्हेन्यू आला होता. आता जर कोणी ओटीटीकडून 250 ते 300 कोटींची ऑफर दिली तर प्रकरण वेगळे आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दोन हजार कोटींची गुंतवणूक असेल

अलीकडेच झी 5 वर आपला 'बमफाड' हा चित्रपट रिलीज करणारे निर्माता प्रदीप कुमार म्हणतात, 'डिजिटल प्लॅटफॉर्मवरील लोकांच्या खूप आक्रमक योजना आहेत. मी असेही ऐकले आहेत की ते येत्या काळात 1500 कोटी ते 2000 कोटी पर्यंत गुंतवणूक करण्यास तयार आहेत.

 

मध्यम आणि लहान बजेटचे चित्रपट आहेत, जे लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर पहात असतात. लॉकडाऊनमध्ये लोकांची सिनेमा पाहण्याची सवय बदलली आहे आणि त्या व्यासपीठावर अधिक कंटेंट बघितला जातोय. जोपर्यंत लॉकडाऊनचा काळ राहणार आहे आणि कोरोनाची लस येत नाही, तोपर्यंत लोक एंटरटेन्मेंट कंटेट हा डिजिटल प्लॅटफॉर्मवरच बघणार आहेत.  अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे आणि ते त्यामध्ये पूर्ण भर देत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांचा ओरिजिनल कंटेंट बनवण्यासाठी  3 ते 8 कोटींचे बजेट ठेवत आहेत. '

बातम्या आणखी आहेत...