आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग डील:सलमान खानच्या ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ची मोठी डील, तब्बल 235 कोटींना विकले गेले चित्रपटाचे सर्व हक्क

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशा प्रकारच्या डीलला अंब्रेला डील म्हटले जाते.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचे डिस्ट्रीब्युशन, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि म्युझिक राइट्स तब्बल 235 कोटींमध्ये विकले गेले आहेत. अशा प्रकारच्या डीलला अंब्रेला डील म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, हे सर्व हक्क ‘झी स्टुडिओज’ने विकत घेतले आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर 14 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सलमानचा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात यशस्वी होईल, असा विश्वास वितरकांनी व्यक्त केला आहे. हा चित्रपट पहिले चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल आणि त्यानंतर झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा प्रीमिअर होईल.

अनेक दिवसांपासून सुरु होती झी आणि निर्मात्यांमध्ये बोलणी
या डीलसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून मेकर्स आणि झी यांच्यात बोलणी सुरु होती. या डीलनुसार सलमानने संपूर्ण चित्रपट ‘झी स्टुडिओज’ला विकला आहे. ज्यामध्ये थिएटरचे अधिकार, ग्लोबल रिलीज, म्युझिक, ओटीटी आणि सॅटेलाईट हक्क पूर्णपणे ‘झी’ कंपनीला देण्यात आले आहेत. ‘झी’ कंपनीनेदेखील त्यांचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डील असल्याचे म्हटले आहे.

सलमान आणि झी यांच्यातील हा करार दोघांसाठी फायदेशीर ठरु शकतो. कारण सलमानचे चित्रपट चांगला व्यवसाय करतात. सलमानने यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. सलमानचा हा चित्रपट 230 कोटींहून अधिक व्यवसाय नक्की करेल, असा विश्वास ‘झी’ कंपनीने व्यक्त केला आहे.

यापूर्वीही सलमानने झीसोबत केल्या अनेक डील
वृत्तानुसार, राधेसाठी झी पूर्वी यशराज फिल्म्ससोबत बोलणी सुरु होती. मात्र काही कारणास्तव ही डील झाली नाही. सलमानने यापूर्वी झी सोबत अनेक डील केल्या आहेत. 'राधे'शिवाय सलमानच्या बॅनरच्या 'कागज'चा ट्रेलरदेखील झीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. 'कागज'मध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. सलमानने यापूर्वी 'रेस 3', 'भारत' आणि 'दबंग 3' साठी झीसोबत डील केली होती.

कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे 'राधे'
सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. चित्रपटात सलमानसह जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा हे देखील लीड रोलमध्ये दिसतील. 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' कोरियन फिल्म 'द आउटलॉज'चा हिंदी रिमेक आहे.

ऑनलाइन प्रदर्शित करण्यासाठी सलमानला मिळाली होती 250 कोटींची ऑफर
विशेष म्हणजे सलमानला त्याचा राधे हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. मात्र सलमानने ओटीटीला नकार दिला. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, असा निर्णय सलमानने घेतला. कोरोनामुळे देशातील अनेक सिनेमागृहे बंद होती. त्यामुळे अनेक मोठ्या चित्रपटांनी सिनेमागृहांची वाट पाहण्याऐवजी ओटीटी पर्याय निवडला. सलमानने मात्र कुठल्याची परिस्थितीत चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करणार असल्याची भूमिका घेतली.

बातम्या आणखी आहेत...