आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग क्लॅश:आता दिवाळीत बॉक्स ऑफिसवर संघर्ष होण्याची शक्यता, अक्षयच्या 'पृथ्वीराज'सोबत रिलीज होऊ शकतो सलमानचा 'राधे'

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे ईदवर सलमानचा 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही, ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीजची शक्यता नाही.
  • यावर्षी 14 नोव्हेंबर रोजी शनिवार दिवाळी असून अक्षय कुमारचा हिस्टोरिलकल ड्रामा 'पृथ्वीराज'साठी ही तारीख बुक करण्यात आली आहे.

कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली नाही, परंतु आता दिवाळीत सलमान आपला 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. तर अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' या हिस्टोरिकल ड्रामासाठी दिवाळीची तारीख आधीच बुक करण्यात आलेली आहे.

उर्वरित 'राधे'ची शूटिंग मुंबईत होणार आहे

सलमानचा 'राधे' आणि अक्षयचा 'लक्ष्मी बॉम्ब' ईदला रिलीज होणार होते. तथापि, लॉकडाऊनमुळे सिनेमा हॉल बंद झाले आणि चित्रपटांमधील हा मोठा संघर्ष टळला. आता 'लक्ष्मी बॉम्ब' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ‘राधे’चे निर्माते मुंबईत उर्वरित शूटिंग पूर्ण करुन दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करणार आहेत.

'पृथ्वीराज'देखील दिवाळीला रिलीज होणार हे निश्चित!

पिंकविलाच्या वृत्तानुसार यशराज फिल्म्सच्या जवळच्या सूत्रांनी याची पुष्टी केली आहे की, प्रॉडक्शन हाऊस अक्षय कुमार स्टारर 'पृथ्वीराज' हा चित्रपट  यंदाच्या दिवाळीत  रिलीज करण्याच्या विचारात आहे. चित्रपटाचे आउटडोअर सेट तुटले आहेत. पण आदित्य चोप्राने आपल्या टीमला इनडोअर सेट्स करण्यास सांगितले आहे.

मर्यादित तंत्रज्ञ आणि स्टाफसह आदित्यने स्टुडिओच्या आत या चित्रपटाच्या चित्रीकरणाची ठोस योजना आखली आहे. त्याला चित्रपटाविषयी पूर्ण खात्री आहे आणि एग्झिबिटर्सच्या संपर्कात आहे. या चर्चेवर विश्वास ठेवला गेला तर ‘राधे’ आणि ‘पृथ्वीराज’ यांची टक्कर जवळजवळ निश्चित मानली जात आहे.

2018 पासून दोन दोन्ही स्टार्समध्ये आहे तणाव

सलमान आणि अक्षय वर्षानुवर्षे खूप चांगले मित्र होते. दोघांनी कित्येक प्रसंगी उघडपणे एकमेकांचे कौतुक केले. पण बातमीनुसार, 2018 मध्ये सलमानने अक्षय कुमार स्टारर फिल्म 'केसरी' च्या सह-निर्मितीपासून माघार घेतल्यावर दोघांमधील संबंध तणावपूर्ण बनले. तथापि, या दोघांनीही हे कधी जाहिर होऊ दिले नाही.

मार्च 2019 मध्ये पहिल्यांदा संघर्ष झाल्याचे समोर आले

मार्च 2019 मध्ये अक्षयने सोशल मीडियावर जाहीर केले होते की, त्याचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट 2020 मध्ये ईदवर प्रदर्शित होईल. सलमानने 'इंशाअल्लाह'साठी ही तारीख निश्चित केली होती, परंतु नंतर त्याने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. 

पुढे जाऊन सलमानने ईदसाठी 'राधे' ची घोषणा केली आणि 'सूर्यवंशी' चे निर्माते रोहित शेट्टी यांच्याशी बोलून आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. मात्र, नंतर अक्षय कुमारने त्याच तारखेला आपला दुसरा चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब' प्रदर्शित करण्याची घोषणा केली. यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...