आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा महत्त्वाचा निर्णय:सलमानने थिएटर मालकांची विनंती केली मान्य, यंदा ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये झळकणार 'राधे'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानच्या या चित्रपटाचे सर्व हक्क झी कडे आहे.

अभिनेता सलमान खानला त्याचा आगामी राधे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी देशभरातील थिएटर एक्झिबिटर असोसिएशनने विनंती केली होती. केवळ सलमान खानचा चित्रपटच महामारीमुळे चित्रपटगृहांना झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी मदत करू शकतो, असा विश्वास चित्रपटगृह मालकांना आहे. आता सलमानने या सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे.

'राधे' ईदच्या मुहूर्तावर येणार
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन सलमानने लिहिले, 'सर्व चित्रपटगृह मालकांना प्रतिसाद देण्यासाठी मला इतका वेळ लागल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या काळातील हा एक मोठा निर्णय आहे. थिएटर मालक आणि चित्रपट वितरक सध्या ज्या आर्थिक समस्येचा सामना करत आहेत ती परिस्थिती मी समजू शकतो. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी मी राधे हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. 2021 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल, इंशाल्लाह. यावर्षी ईदला थिएटरमध्ये राधेचा आनंद घ्या,' अशा आशयाची पोस्ट सलमानने शेअर केली आहे.

सलमान खानची निर्मिती आहे 'राधे'

सलमानच्या या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. परंतु सलमानने ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटर मध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे.

‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले असून, यामध्ये सलमान खानसह दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जॅकी श्रॉफ, जरीना वहाब आणि रणदीप हुडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. 'राधे' या चित्रपटाची निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांचे बॅनर सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स आणि रील लाइफ प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...