आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलमान खान स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटाचा टायटल ट्रॅक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. संगीतकार आणि गायक साजिदच्या आवाजात हा एंटरटेनर ट्रॅक आहे. टायटल ट्रॅकवर सलमान खान आणि दिशा पटानी यांनी ताल धरला आहे.
गाण्याच्या व्हिज्यूअलमध्ये सलमान खान स्टाइल एंटरटेन्मेंटचे ते प्रत्येक गुण आहेत जे चाहत्यांच्या हृदयात आपली विशेष जागा निर्माण करतील. सलमान खान डॅशिंग दिसत असून हा ट्रॅक चित्रपटातील राधेच्या व्यक्तिरेखेला हुबेहूब सादर करतो आहे. हे गाणे डान्स मास्टर मुदस्सर खानने कोरिओग्राफ केले आहे. याआधी प्रदर्शित झालेली गाणी ‘सिटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ आधीपासूनच चार्टमध्ये सर्वात वरती आपली जागा बनवली आहे आणि आता, टायटल ट्रॅकदेखील यामध्ये सामील होण्यासाठी सज्ज आहे.
गाण्यातून वाजिद खानला श्रद्धांजली
गाण्याच्या माध्यमातून साजिदने त्याचा दिवंगत भाऊ वाजिदला श्रद्धांजली वाहिली आहे. याविषयी साजिद म्हणाला, गाण्यात आयकॉनिक ट्यून आहे. ती प्रेक्षकाचे लक्ष आकर्षित करेल. सलमानने या टायटल ट्रॅकवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मला बोलावले होते. त्यानंतर मी गाण्याला आवाज देण्याचे ठरवले. हे गाणे माझ्या खूप जवळचे आहे. या माध्यमातून मी माझा भाऊ वाजिदला श्रद्धांजली देऊ इच्छित आहे.
सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.