आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानची ईदी:सलमान खानचा 'राधे' ईदच्या मुहूर्तावरच थिएटरसह वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित, उद्या येणार चित्रपटाचा ट्रेलर

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 40 परदेशातील चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होणार आहे

देशभरात कोरोनाची भीषण परिस्थिती असूनही सलमान खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. बहुतेक राज्यात थिएटर सुरु आहेत. सद्यपरिस्थितीत सलमानने त्याचा आगामी 'राधेः योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट ठरलेल्या दिवशीच थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सलमानने नेहमीप्रमाणे ईदला चाहत्यांना ईदी देणार आहे.

हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 14 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे आणि त्याच तारखेला हा चित्रपट ‘पे-पर-व्ह्यू’ अंतर्गत झीप्लेक्सवरदेखील येणार आहे. त्याअंतर्गत प्रेक्षकांना निश्चित रक्कम देऊन हा चित्रपट झीप्लेक्सवर बघता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (22 एप्रिल) रिलीज होणार आहे.

थिएटरसोबतच झी प्लेक्सवर येणार 'राधे'
झी स्टुडिओचे शरद पटेल म्हणाले, "कोरोनाच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सवर रिलीज करत आहोत. सोबतच 40 ओव्हरसीज मार्केट जिथे जिथे थिएटर सुरु आहेत, तिथेही चित्रपट रिलीज होणार आहे. जर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला नाही, तर ती सलमानच्या चाहत्यांची फसवणूक केल्यासारखे असेल. आम्हालाही सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आम्ही तो झीप्लेक्सवरही रिलीज करत आहोत. जेणेकरुन चाहते घरबसल्याही चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील."

आम्हाला थिएटर संचालक आणि मालकांच्या हक्कांची देखील काळजी घ्यायची होती
सलमान खानचे प्रवक्ते म्हणाले, "सद्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व भागधारक एकत्र आले. आम्ही सिनेमा इंडस्ट्री चालू ठेवण्यासाठी मधला मार्ग निवडला. आम्हाला थिएटर संचालक आणि मालकांच्या हक्कांची काळजी देखील घ्यायची होती. आम्ही सर्व सेफ्टी प्रोटोकॉलचे पालन करत आहोत. अशा परिस्थितीत थिएटरसोबतच घरबसल्या चित्रपट बघण्याचा पर्याय आम्ही प्रेक्षकांना दिला आहे."

हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत
'झी 5' इंडियाचे सीईओ मनीष कालरा म्हणाले की, "आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल खूप उत्सुक आहोत. हा बहुभाषिक चित्रपट आहे. हा वर्षाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर आहे. सलमानसोबत या चित्रपटाचा करार करून आनंद झाला आहे."

हा चित्रपट 40 परदेशातील चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होणार आहे
हा चित्रपट 40 ओव्हरसीज देशातील थिएटरमध्ये रिलीज होईल. यात मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युरोपचा समावेश आहे. इंग्लडमध्ये गेल्या वर्षीपासून लॉकडाउननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट असेल.

बातम्या आणखी आहेत...