आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राधे: योर मोस्ट वाँटेड भाई:धमाकेदार अ‍ॅक्शन, संगीत आणि ड्रामाची मेजवानी असलेला ट्रेलर रिलीज, 97 एनकाउंटर करणा-या कॉपच्या भूमिकेत दिसणार सलमान खान

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईदच्या मुहूर्तावर सलमान खान मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

सुपरस्टार सलमान खान स्टारर ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. या अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटाद्वारे सलमान खान तब्बल दीड वर्षानंतर सिल्व्हर स्क्रिनवर परतत आहे. 20 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या 'दबंग 3' या चित्रपटात तो अखेरचा मोठ्या पडद्यावर दिसला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट येत्या 13 मे रोजी थिएटरसह 'पे-पर-व्ह्यू'अंतर्गत झीप्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय.

स्पेशल कॉपच्या भूमिकेत दिसणार सलमान खान

चित्रपटात सलमान खान स्पेशल कॉप राधेच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत सुरु असलेला अमली पदार्थांचा व्यापार आणि गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रित करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. राधेची काम करण्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे. अगदी 'वाँटेड' (2009) चित्रपटातील भूमिकेसारखीच. ट्रेलरमध्ये सलमान 'वाँटेड'मधील गाजलेला डायलॉग 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपनी आपकी भी नहीं सुनता' म्हणताना दिसला आहे.

अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेल्या ट्रेलरमध्ये सलमान गुन्हेगारांना सळो की पळो करताना दिसतोय. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा पाटनी आहे. रणदीप हूडा या चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे. गोविंद नामदेव आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.

सलमान म्हणाला होता - ईद का वादा है ईद पर ही आएंगे
सलमान खानने काही दिवसांपूर्वी 13 मार्च ही प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली होती. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तो म्हणाला होता, ""ईद का कमिटमेंट था, ईद पर ही आएंगे, क्योंकि एक बार जो मैंने...(कमिटमेंट कर दी तो मैं अपनी आपकी भी नहीं सुनता।)""

बातम्या आणखी आहेत...