आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडच्या 'भाईजान'ची क्रेझ:सलमान खानच्या 'सिटी मार' गाण्याने मोडले सर्व रेकॉर्ड, ठरले 24 तासात जगभरात सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’मधील 'सिटी मार' या गाण्याने अवघ्या 24 तासांत तोडले सगळे रेकॉर्ड!
  • 24 तासात जगभरातील सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटातील 'सिटी मार' हे गाणे 26 एप्रिलला प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यात सलमान खान आणि दिशा पटानीचा जलवा प्रेक्षकांना बघायला मिळाला. अवघ्या 24 तासात या गाण्याने अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

या गाण्याने सर्वच मंचावर 30 मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला असून 24 तासात जगभरातील सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे ठरले आहे. प्रदर्शनानंतर काही वेळातच, हे गाणे ट्विटरवर ट्रेंड झाले होते. तसचे ‘सिटी मार’ या गाण्याला यूट्यूबवर 2 लाख लाईक्स मिळाले आहेत. इतक्या कमी वेळात यूट्यूबवर 2 लाख लाइक्स मिळणारे हे बॉलिवूडमधील पहिले गाणे ठरले आहे.

जवळपास वर्षभरानंतर चाहते सलमान खानला मोठ्या पडद्यावर बघणार आहेत. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते यातच चित्रपटाच्या ट्रेलरने आणि पाठोपाठ आलेल्या गाण्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आकर्षक बीट्स, सलमान- दिशा यांची सेन्सेशनल केमिस्ट्री आणि थिरकायला लावणारे डान्स मूव्ससोबत, ‘सिटी मार’ने दर्शकांचे भरपूर मनोरंजन केले. ‘सिटी मार’च्या ‘हुक स्टेप्स’ना प्रचंड पसंती मिळत असून चाहते या चार्टबस्टरवर शिट्ट्या आणि ठेका धरण्याण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीयेत.

'सिटी मार' या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे. तर जानी मास्टर यांनी याची कोरियोग्राफी केली आहे.

सलमान खानसोबत या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 13 मे रोजी थिएटरसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...