आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्ते चक्रीवादळाचा फटका:चक्रीवादळाने सलमान खानच्या ‘टायगर 3’सह अजय देवगणच्या 'मैदान'च्या सेटचे झाले नुकसान

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला मोठा तडाखा बसला आहे.यात सामान्यांसह सेलिब्रिटींच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले. चित्रपटांच्या सेट्सचेही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सलमान खानच्या 'टायगर 3'सह अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटांच्या सेट्सचे या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

'टायगर 3'साठी गोरेगावच्या एसआरपीएफ ग्राउंडवर उभारण्यात आला होता सेट
‘टायगर 3’ चित्रपटात दुबईमधला बाजार शूट करण्यासाठी गोरेगावमधल्या एसआरपीएफ ग्राउंडवर भलामोठा सेट उभारण्यात आला होता. तौक्ते चक्रीवादळात हा भलामोठा सेट उडून गेला. सुदैवाने सध्या मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगवर बंदी घातल्यामुळे यावेळी इथे कोणतीही शूटिंग सुरू नव्हती. त्यामुळे येथे जास्त कुणाचा वावर नसल्यामुळे यात कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतू चित्रपटाच्या निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेट उडून गेल्याने येणाऱ्या काही दिवसांत जी शूटिंग होणार होती ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

अजय देवगणच्या 'मैदान'चे झाले नुकसान
तौक्ते चक्रीवादळाचा फटका अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'मैदान' या चित्रपटाच्या सेटला बसला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई बाहेरच्या विस्तीर्ण मैदानावर होतं आहे. यासाठी तब्बल 16 एकरची जमीन घेण्यात आली आहे. यावर सेट बांधण्यात आला होता. तौक्ते वादळाने या जागेचे बरेच नुकसान केले. हे चक्रीवादळ आले तेव्हा सेटची काळजी घेण्यासाठी 40 पेक्षा जास्त माणसे तिथे होती. यात काही सुरक्षारक्षकांचाही समावेश होतो. त्यांनी हे वादळ आल्यानंतर सेट वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.

बातम्या आणखी आहेत...