आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण'मध्ये सलमानचा कॅमिओ:शाहरुखच्या 'पठाण' मध्ये दिसणार सलमानचा अ‍ॅक्शन पॅक्ड अवतार, या चित्रपटाच्या क्लायमॅक्सपासून सुरु होईल 'टायगर 3'ची कथा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुख या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता शाहरुख खानचे चाहते मोठ्या स्क्रीनवर त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत, लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर शाहरुखने त्याच्या आगामी 'पठाण' या अ‍ॅक्शन फिल्मची शूटिंग सुरू केली आहे. 'वॉर'मधे हृतिक आणि 'टायगर' सीरिजमध्ये सलमानला डिटेक्टिव्ह म्हणून दाखवल्यानंतर आता आदित्य चोप्रा शाहरुखला या चित्रपटात एक गुप्तहेर म्हणून दाखवणार आहे.

'पठाण' मध्ये शाहरुख-सलमान एकत्र दिसणार

'पठाण' च्या क्लायमॅक्समध्ये सलमान 'टायगर उर्फ ​​अविनाश' च्या भूमिकेत अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. 'पठाण'च्या क्लायमॅक्सपासून 'टायगर 3'ची कथा सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. 'करण-अर्जुन' नंतर शाहरुख आणि सलमान या चित्रपटात एकत्र अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.

शाहरुख-दीपिकाची जोडी पुन्हा दिसणार

'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि 'हॅपी न्यू इयर' नंतर 'पठाण' चित्रपटात पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिका पदुकोण एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात दोघे गुप्तहेराच्या भूमिकेत जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...