आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा बायोपिक आणि कंगना रनोट स्टारर 'थलायवी' या चित्रपटातील पहिले गाणे 'चली चली 'शुक्रवारी प्रदर्शित झाले. इरशाद कामिल यांनी लिहिलेल्या या गाण्याला सैंधवी प्रकाश यांनी स्वरसाज चढवला आहे. तर त्याचे संगीतकार सैंधवी यांचे पती जी.व्ही. प्रकाश कुमार आहेत. कंगनाने सोशल मीडियावर हे गाणे शेअर केले आणि लिहिले की, "अम्मांच्या सिनेमापासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासाचे साक्षीदार व्हा." ए.एल विजय दिग्दर्शित 'थलायवी' हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी रिलीज होतोय.
सेन्सॉर बोर्डने कात्री न लावता पास केला ‘राधे...’चा ट्रेलर
सलमान खानच्या अभिनयाने सजलेला ‘राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट यंदा ईदला येणार आहे. निर्माते त्याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टीझर लाँच करणार होते. मात्र आता टीझरऐवजी निर्माते थेट ट्रेलर रिलीज करणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळाले आहे. काही काळापूर्वी सलमान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांनी चित्रपटाचा ट्रेलर ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडे सादर केला होता. ट्रेलरमध्ये सलमानच्या डायलॉगपासून अॅक्शनपर्यंत सर्व काही आहे. सर्व काही सुरळीत पार पडले तर हा चित्रपट 13 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
श्वेता तिवारीची मुलगी पलकचा डेब्यू चित्रपट 'रोजी: द सैफरन चॅप्टर'चा टीझर समोर आला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर टीझर शेअर करत चित्रपट अखेरच्या शेड्यूलमध्ये दाखल झाल्याचे सांगितले आहे. चित्रपटात अरबाज खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच मल्लिका शेरावत देखील यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. विकास रंजन मिश्रा दिग्दर्शित या हॉरर थ्रिलर चित्रपटाच्या टीझरमध्ये व्हिज्युअल नाही. चित्रपटाची कथा सत्यघटेनवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.
अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा अभिनय असलेल्या ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. मुंबईत शुक्रवारी चित्रपटाचा मुहूर्त शॉट शूट करण्यात आला. रश्मिका शुक्रवारीच टीमला जॉइन झाली आहे तर बिग बी 4 एप्रिलपासून शूटिंग सुरू करणार आहेत. ‘गुडबाय’मध्ये दिग्दर्शक विकास बहल आणि निर्माती एकता कपूर पुन्हा एकदा सोबत काम करणार आहेत. यापूर्वी दोघांनी ‘लुटेरा’ आणि ‘उडता पंजाब’मध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटाविषयी एकता म्हणाली, ‘गुडबाय खूपच चांगल्या विषयावर बनला आहे. यात इमाेशन आणि एंटरटेनमेंट दोन्हीची मात्र बरोबर आहे. हा प्रत्येक कुुटुंबाला आपलासा वाटेल. मी बच्चन सरांसोबत काम करण्यात उत्सुक आहे आणि स्वत:ला या चित्रपटात सादर करण्यासाठी आतुर आहे. चित्रपट आपल्या शीर्षकाप्रमाणेच मजेदार आहे. यात टीव्ही अभिनेता शिविन नारंगदेखील दिसणार आहे. चित्रपटाचे बरेच शूटिंग चंदीगडमध्ये होणार आहे.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर 'मेजर’ चित्रपट येत आहे. यात सई मांजरेकर, संदीप यांच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. दिव्य मराठीने चित्रपटातील सईचा एक्सक्लुझिव्ह लूक आणला आहे. मेजरमध्ये सईच्या पात्राचे नाव ईशा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.