आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या पहिल्या पगाराचा किस्सा:सुपरस्टार सलमान खानची पहिली कमाई होती 75 रुपये, 'मैंने प्यार किया' 31 हजारांत केला होता साइन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राधे: योर मोस्ट वाँडेट भाई या चित्रपटात दिसणार सलमान

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट बॉक्सऑफीवर कोटींची उलाढाल करतात. 1988 मध्ये सलमानने फिल्म इंडस्ट्रीत अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली, हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यापूर्वी सलानला एका कामासाठी 75 रुपयांचा चेक मिळाला होता.

PTI ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यासंदर्भात खुलासा केला. सलमानने त्याच्या पहिल्या पगाराचा किस्सा सांगितला. तो सांगतो, 'मला आठवतंय की, माझा पहिला पगार हा 75 रुपये होता. मी ताज हॉटेलमध्ये एका शोमध्ये पाठीमागे डान्स केला होता. माझा एक मित्र तिथे डान्स करत होता. मलाही सहज एक गंमत म्हणून त्याने तिथे बोलावले होते,' असा खुलासा सलमानने केला. त्यानंतर एका सॉफ्ट ड्रिंकच्या ब्रॅन्डची जाहिरात करण्यासाठी सलमानला 750 रुपये मिळाले होते. त्यानंतर त्याचे 1500 रुपये मिळत होते. तसंच 'मैने प्यार किया' चित्रपटासाठी सलमानला 31 हजार रुपये मानधान देण्याचे ठरले होतं. मात्र, नंतर त्याव वाढ करण्यात आली आणि ते 75 हजार रुपये करण्यात आल्याचे, त्याने सांगितले.

100 कोटी क्लबमध्ये सामील झाले सलमानचे चित्रपट

1989 मध्ये प्रदर्शित झालेला बीवी हो तो ऐसी हा सलमान खानचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्याने 'मैंने प्यार किया' या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती. तो त्याकाळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. 2009 मध्ये आलेल्या वाँटेड रिलीज झाल्यापासून सलमानचे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि त्याचे चित्रपट 100 कोटी क्लबदेखील सामील होत गेले.

राधे: योर मोस्ट वाँडेट भाई या चित्रपटात दिसणार सलमान

सलमान खान आगामी ‘राधे: योर मोस्ट वाँडेट भाई’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रथम डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर चित्रपट वितरकांनी सलमानला पत्र लिहून चित्रपट डिजिटलपणे प्रदर्शित न करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनंतर सलमानने त्याचा हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतोय.

बातम्या आणखी आहेत...