आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Samantha Akkineni And Naga Chaitanya Divorced, The Actress Issued An Official Statement Saying 'Give Us Privacy To Move Forward From This'

दक्षिणेतील लोकप्रिय जोडप्याचा घटस्फोट:समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांचा काडीमोड, अधिकृत निवेदन जारी करत अभिनेत्री म्हणाली - 'या कठीण काळात आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या'

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोटगी म्हणून समांथाला मिळणार 50 कोटी

मागील अनेक दिवसांपासून समांथा अक्किनेनी आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर आज दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. समांथाने एक अधिकृत निवेदन जारी केले असून आम्हाला या कठीण काळात पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या, अशी विनंती चाहते आणि माध्यमांना केली आहे.

समांथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले, 'आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, चाई (नागा चैतन्य) आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल.'

चाहते आणि माध्यमांना केली विनंती
समांथाने पुढे लिहिले, 'आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.'

हे दोघेही त्यांच्या लग्नासंदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही बातमीला कोणतेही उत्तर देत नव्हते. घटस्फोटाच्या निर्णयानंतर कौटुंबिक न्यायालयात दोघांचे समुपदेशन देखील केले गेले, मात्र त्याचा फायदा झाला नाही.

पोटगी म्हणून मिळणार 50 कोटी

घटस्फोटानंतर समांथाला पोटगी म्हणून एकूण 50 कोटी रुपये मिळतील. जुलै महिन्यात अभिनेत्रीने सोशल मीडियावरून तिचे आडनाव ‘अक्किनेनी’ काढून टाकले होते. यानंतर प्रत्येकाला या जोडीतील दुराव्याची बातमी मिळाली. समांथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न केले. दोघे 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटात पहिल्यांदा पडद्यावर दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...