आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यात दुरावा!:समांथा आणि नागा चैतन्य यांचे वैवाहिक आयुष्य धोक्यात?, समांथा म्हणाली -  'या चर्चांवर तेव्हाच बोलेन जेव्हा मला योग्य वाटेल'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता समांथाने एका मुलाखतीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री समांथा अक्किनेनी यांच्या वैवाहिक आयुष्यात वितुष्ठ निर्माण झाल्याची चर्चा आहे. समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे अडनाव काढल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. आता समांथाने एका मुलाखतीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली आहे.

समांथा आणि नागा चैतन्य मागील काही दिवसांपासून वेगळे राहात असल्याचे वृत्त आहे. एका मुलाखतीमध्ये यावर बोलताना समांथा म्हणाली, ‘मी या सर्व अफवांवर आणि चर्चांवर तेव्हाच बोलेन जेव्हा मला योग्य वाटेल.’ असे म्हणत तिने सध्या या चर्चांवर मौन बाळगले आहे.

समांथाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या नावात बदल केला. तिने अक्किनेनी हे आडनाव काढत नावासमोर फक्त इनिशिअल वर्ल्ड 'S' ठेवले होते. तिने नावात हा बदल केल्यानंतर चाहते हैराण झाले होते. त्यावरुन नागा आणि तिच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले.

समांथा आणि नागा यांनी 2010 मध्ये माया चेसावे या तेलुगु चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांनी जानेवारी 2017 मध्ये हैदराबाद येथे साखरपुडा केला होता आणि 6 ऑक्टोबर 2017 रोजी गोव्यात लग्न केले होते. लग्नानंतर तिने आपल्या नावासमोर अक्किनेनी हे आडनाव जोडले होते.

बातम्या आणखी आहेत...